दहावीत 99 टक्के गुण ; निकालानंतर 5 दिवसातच ब्रेन हॅमरेजने मृत्यू 

गुजरातच्या राजकोटमध्ये राहणाऱ्या हीरच्या कुटुंबाने एक आदर्श घालून दिला आहे. कुटुंबीयांनी धाडस दाखवत नेत्रांसह मुलगी हीरचे पार्थिव दान केले.

दहावीत 99 टक्के गुण ; निकालानंतर 5 दिवसातच ब्रेन हॅमरेजने मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गुजरातच्या हीरने (gujarat Heer)दहावीमध्ये राज्यात टॉप (state top in 10th )करत 99. 70 टक्के गुण मिळवले. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवसात हीरचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू (Heer died of brain hemorrhage )झाला. पण डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या हीरच्या कुटुंबियांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. कुटुंबीयांनी धाडस दाखवत नेत्रांसह मुलगी हीरचे पार्थिव दान केले.

गुजरातमधील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय हीर हिला डॉक्टर होण्याची इच्छा होती. 11 मे रोजी गुजरात बोर्डाने 10वीचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हीरने परीक्षेत 99.70% गुण मिळवले. बोर्डात टॉपर्समध्ये हीरचे नाव होते. हीरला गणितात 100 आणि विज्ञानात 94 गुण मिळाले होते, मात्र,  निकालाच्या पाचव्या दिवशी ब्रेन हॅमरेजमुळे हीरचा मृत्यू झाला. गुजरात बोर्डात टॉपर असलेल्या हीरचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. मात्र, त्यानंतरही गुजरातच्या राजकोटमध्ये राहणाऱ्या हीरच्या कुटुंबाने एक आदर्श घालून दिला आहे. कुटुंबीयांनी धाडस दाखवत नेत्रांसह मुलगी हीरचे पार्थिव दान केले.

राजकोट येथे राहणारे मोरबी येथील प्रफुल्लभाई घाटिया यांची मुलगी हीर हिला महिनाभरापूर्वी ब्रेन हॅमरेज झाला होता. हीरच्या कुटुंबीयांनी हीरवर राजकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. पण काही दिवसांनी हीरला पुन्हा श्वास आणि हृदयाचा त्रास होऊ लागला. यानंतर कुटुंबीयांनी हीरला राजकोट येथील ट्रस्ट संचालित बीटी सावनी रुग्णालयात दाखल केले.


एमआरआय अहवालानंतर हीरच्या मेंदूचा 80 ते 90 टक्के भाग काम करत नसल्याचे समोर आले. त्यानंतर हीरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या अथक परिश्रमानंतरही हीरच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने 15 मे 2024 रोजी हीरने या जगाचा निरोप घेतला.