MPSC NEWS : मुख्य परीक्षा 2023 'या' तारखेपासून संमती विकल्प सादर करता येणार

यासाठी प्रोफाइल मध्ये संमती विकल्प २० मे ते ३० मे या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

MPSC NEWS :  मुख्य परीक्षा 2023  'या' तारखेपासून संमती विकल्प सादर करता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दुय्यम निबंधक (श्रेणी १) मुद्रांक निरीक्षक आणि राज्य निरीक्षक (Sub Registrar (Grade 1) Inspector of Stamps and State Inspector) या पदावर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या तसेच तात्पुरत्या निवड यादीत समाविष्ट झालेल्या सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील उमेदवारांकडून ते कोणत्या संवर्गाकरिता प्रथम पसंती (First choice) देत आहेत. त्याबाबत त्यांचे संमती विकल्प (Consent Options) मागवण्यात येत आहेत. या अनुषंगाने त्यांच्या प्रोफाइल मध्ये संमती विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासाठी २० मे ते ३० मे या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन दिली असून एमपीएससीतर्फे (MPSC) यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एमपीएससीतर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार उमेदवारास स्विकारले (Accepted) हा पर्याय निवडावा लागेल. उर्वरित संवर्गांसाठी उमेदवारास Give up 1/Give up 2 हा पर्याय निवडावा लागेल. ज्या संवर्गासाठी Give up 1/Give up 2 पर्याय निवडला आहे, त्या संवंर्गांकरिता त्यांच्या उमेदवारीचा विचार न करता इतर उमेदवारांचा गुणवत्तेवर विचार करण्यात येईल.

परीक्षेसाठी संमती विकल्प (Consent Submission) सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये Consent Submission वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक २० मे, २०२४ ते दिनांक ३० मे, २०२४ या कालावधीत सुरु राहील.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार संमती विकल्प मागविण्यात येत असल्याने सदर संमती विकल्प ऑनलाईन पध्दतीने आयोगास सादर करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या उपरोक्त कालावधीत विहीत ऑनलाईन पध्दतीने संमती विकल्प सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचा अंतिम निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.

संमती विकल्प (Consent Submission) सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.