विद्यापीठातील नाटक ABVP संघटनेने पाडले बंद; देवी ,देवतांचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांच्या तोंडी आक्षेपार्ह विधाने

देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि भाषा वापरून बदनामी केली जात आहे. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही,

विद्यापीठातील नाटक ABVP संघटनेने पाडले बंद; देवी ,देवतांचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांच्या तोंडी आक्षेपार्ह विधाने

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात (Savitribai Phule Pune University) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकात प्रभू श्री रामचंद्र व सीतामाता यांचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी आक्षेपार्ह विधानांचा वापर केला. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP)हे नाटक बंद पाडण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे रूपांतर पुढे भांडणात झाले आणि विद्यापीठाच्या आवारात पुन्हा एकदा राडा झाला.

 विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात काही विद्यार्थ्यांनी रामलीला साकारणाऱ्या कलाकारांचे पडद्यामागचे जीवन यावर नाटक सादर केले. त्यात शिव्या व आक्षेपार्ह विधानांचा वापर केला जात होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे गोंधळ घातला. देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि भाषा वापरून बदनामी केली जात आहे. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही,त्यामुळे संबंधित दोषण विरोधात कारवाई करावी अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतली. 

दरम्यान, विद्यापीठ प्रशासन व ललित केला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

--------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवता बद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी. 

-  शिवा बारोळे , अध्यक्ष, अभाविप पुणे विद्यापीठ