वडील मुकबधिर, मुलगीही अंध; बुध्दिबळ, ज्युडोत तरबेज असलेल्या गीतांजलीची अभ्यासातही गरुडझेप

गीतांजलीने इयत्ता १२ वी मध्ये ७७ टक्के मिळवले आहेत. वडील मुकबधिर असून आईवरच तिची सर्व जबाबदारी आहे. अनेक अडचणींशी सामना करत गीतांजलीने आपल्या अंधत्वावर मात केली आहे.

वडील मुकबधिर, मुलगीही अंध; बुध्दिबळ, ज्युडोत तरबेज असलेल्या गीतांजलीची अभ्यासातही गरुडझेप
Geetanjali Dhobe

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मी अंध आहे म्हणून आई वडिलांनी कधीच माझ्याकडे बिचारी म्हणून पहिले नाही. माझ्यावर पूर्ण विश्वास दाखविला. मला जे जे करायचे आहे, ते करू दिले, अशी भावना बीएमसीसी महाविद्यालयात (BMCC College) इयत्ता बारावीच्या (HSC Result) परीक्षेत अपंग विद्यार्थ्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या गीतांजली ढोबे (Geetanjali Dhobe) या विद्यार्थिनीने  व्यक्त केल्या आहेत. गीतांजली राष्ट्रीय स्तरावरची बुध्दिबळ आणि ज्युडो ची खेळाडू सुद्धा आहे.

गीतांजलीने इयत्ता १२ वी मध्ये ७७ टक्के मिळवले आहेत. वडील मुकबधिर असून आईवरच तिची सर्व जबाबदारी आहे. अनेक अडचणींशी सामना करत गीतांजलीने आपल्या अंधत्वावर मात केली आहे. राष्ट्रीय स्तरावर बुध्दिबळ आणि ज्युडोमध्येही तिने नाव कमावले आहे. पण हे करत असताना ती अभ्यासातही उल्लेखनीय यश मिळवत आहे.

बारा तास रुग्णालयात नोकरी अन् रात्री शाळेत; बारावीच्या परीक्षेत मुस्कान पहिली

 'एज्युवार्ता' शी बोलताना गीतांजली  म्हणाली, माझे वडील मूक बधिर आहेत. हे सराफ व्यवसायाशी निगडित काम करतात. माझी आई गृहिणी आहे. एक  मोठा भाऊ आहे, तोही शिकत आहे. माझे कुटुंब नेहमीच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

मी अंध आहे म्हणून त्यांनी मला कुठेच मागे पडू दिले नाही. अभ्यास असो, बुद्धिबळ किंवा ज्युडो सर्व क्षेत्रात त्यांनी मला प्रोत्साहन दिले. आईने स्वतःसाठी कधीच वेळ काढला नाही. मला कॉलेजला सोडणे-आणणे, माझ्या सर्व गरजा पूर्ण करणे यातच तिचा वेळ निघून जातो, अशी भावना गीतांजलीने व्यक्त केली. महाविद्यालयातील शिक्षकांनीही कायम मला पाठिंबा दिला. मला कधीही रायटरची अडचण भासू दिली नाही. गीतांजलीला भविष्यात आयटी क्षेत्रात करिअर करायचे आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo