आक्रमकतेला संयमितपणे आचरणात आणण्याचा बोध 'एनएनएसने दिला : प्रवीण तरडे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाच्या समारोप झाला.

आक्रमकतेला संयमितपणे आचरणात आणण्याचा बोध 'एनएनएसने दिला : प्रवीण तरडे 
Pravin Tarade


 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क (NSS)

विचारांमधल्या आक्रमकतेला संयमितपणे आचरणात आणण्याचा बोध राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून दिला जातो. त्यासाठी योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत होत असलेले कार्य हे देशातील युवा पिढीला दिशा देणारे ठरेल, असे मत मत चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarade) यांनी 
 शनिवारी व्यक्त केले. 

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग  आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी तरडे बोलत होते.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्थीकेन, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, सागर वैद्य, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.

तरडे म्हणाले, “ शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच ग्रामीण भागाची खरी ओळख होत असते. त्यामुळे कँपसला कम्युनिटीशी थेट जोडण्याचे कामंच ही योजना करत आली आहे. त्यासाठी योजनेचे अधिकारी-प्राध्यापक हे त्यांच्या कार्यातून एक वैचारिक अधिष्ठानंच विद्यार्थ्यांसमोर उभे करत असतात.” 

नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान आणि संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनाही त्यासाठी पूरक काम करू शकेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. काळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला. जी-२० परिषदेसारख्या उपक्रमांमुळे मिळणारे व्यासपीठ प्रभावीपणे वापरून हे भारतीय ज्ञान आणि संस्कृतीची ओळख जगासमोर मांडण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.डॉ. चाकणे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.सदानंद भोसले यांनी आभार मानले.