'युवा संवाद २०४७' सारखे कार्यक्रम राज्यभर व्हावेत : चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा समन्वयकांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली.

'युवा संवाद २०४७' सारखे कार्यक्रम राज्यभर व्हावेत : चंद्रकांत पाटील
SPPU Youth Sanwad 2047

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आपण नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. परंतु स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करताना युवकांमध्ये (Youth) वक्तृत्व व नेतृत्वाचा विकास व्हावा त्यांच्यामध्ये राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलेल्या पंच तत्त्वांची माहिती युवकांना व्हायला हवी. यासाठी युवा संवाद २०४७ सारखे कार्यक्रम राज्यभर होण्याची आवश्यकता असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. (SPPU Latest News)

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा समन्वयकांची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे (Dr Karbhari kale) यांनी भूषवले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, क्षेत्रीय संचालक, राष्ट्रीय सेवा योजना पुणे डी. कार्तिकेयन,  राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे,  डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजना, लेखाधिकारी मंगेश खैरनार आणि विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यावेळी उपस्थित होते.

कार्यशाळेत जी -२० व युवक, युवा संवाद २०४७ आयोजन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी राज्यस्तरीय कार्यशाळा, पी. एफ. एम. एस कार्यप्रणाली निधीवितरण व खर्च अशा महत्त्वपूर्ण विषयावर चार सत्रांमध्ये चर्चा केली गेली. डॉ.कारभारी काळे म्हणाले, भारताच्या भविष्याच्या दृष्टीने युवक हा महत्वाचा घटक आहे. या युवकांना दिशा देण्याचे काम आपण या युवा संकल्प कार्यक्रमातून देत आहोत. 

राजेश पांडे यांनी महाविद्यालय स्तरावर व विद्यापीठ स्तरावर युवा संवाद २०४७ आयोजित करून युवकांना प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका मांडली. डॉ. संजय चाकणे यांनी राज्यस्तरीय कार्यक्रमाधिकारी कार्यशाळेच्या आयोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. कार्तिकेयन यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध योजना युवा संवाद या संदर्भात मार्गदर्शन केले. मंगेश खैरनार यांनी पी एफ एम एस या संदर्भातील सर्व शंकांचे निरसन व मार्गदर्शन केले.