सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी; निवास, भोजन सर्वकाही मोफत   

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे ७ व ८ जून रोजी मुलाखती होतील.

सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी; निवास, भोजन सर्वकाही मोफत   
CDS Training

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी नाशिकमधील (Nashik) छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात १९ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत राज्य शासनातर्फे (Maharashtra Government) युवक व युवतींसाठी सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय केली जाणार आहे. पात्र युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. (Combined Defence Services Training)

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे ७ व ८ जून रोजी मुलाखती होतील. सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत मुलाखती होणार आहेत. मुलाखतीला येताना पात्र युवकांनी पुण्यातील सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६१) कोर्ससाठी संबंधित  परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत मोठी अपडेट

केंद्रीय संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी) मार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी ३ सप्टेंबर कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ जून आहे. ऑनलाईन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर भरता येतील.

प्रशिक्षणाविषयीच्या अधिक माहितीसाठी युवकांनी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राशी ०२५३-२४५०३२ या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत किंवा प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo