डॉ. राम ताकवले यांच्या स्मृती जपण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार

पुण्यातील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. राम ताकवले यांच्या स्मरणार्थ राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत बैठक घेण्यात आली.

डॉ. राम ताकवले यांच्या स्मृती जपण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार
NCP Chief Sharad Pawar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.राम ताकवले (Dr Ram Takawale) यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान कालातीत असून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला असून डॉ. ताकवले यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला आयोजित करणे, शैक्षणिक पुरस्कार देणे, डिजिटल स्वरूपातील अभ्यासक्रम सुरू करणे आदी निर्णय रविवारी घेण्यात आले.

पुण्यातील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. राम ताकवले यांच्या स्मरणार्थ राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत (Vivek Sawant), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे (VC Dr Sanjeev Sonawane), माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) , सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे आदी उपस्थित होते.   

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच सावरकर; सावित्रीबाई फुले यांचाही समावेश होणार

'एज्युवार्ता' शी संवाद साधताना विवेक सावंत म्हणाले, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ स्व.राम ताकवले यांनी नेहमी डिजिटल शिक्षणाचा आग्रह धरला. विविध इमारती बांधण्याऐवजी अधिकाधिक विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपातील शिक्षण मिळावे, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 'डिप्लोमा ई एज्युकेशन फॉर डिजिटल सोसायटी' हा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाच्या सहयोगाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक म्हणून सध्या सेवेत असलेल्या आणि शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दाखवले यांच्या स्मरणार्थ स्मृती व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.तसेच मुक्त विद्यापीठाच्या संलग्नतेने प्रो. राम ताकवले रिसर्च फेलोशिप देण्याबाबत चर्चा झाली.

वडील मुकबधिर, मुलगीही अंध; बुध्दिबळ, ज्युडोत तरबेज असलेल्या गीतांजलीची अभ्यासातही गरुडझेप

डॉ.राम ताकवले यांनी आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे संपूर्ण साहित्य , भाषणे, पुस्तके संग्रहित करून डिजिटल स्वरूपात वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तीला डॉ.राम ताकवले यांच्या नावाने शैक्षणिक पुरस्कार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, असेही सावंत यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo