विद्यापीठाकडून एमबीएच्या परीक्षांना चार महीने उशीर; विद्यार्थी संतप्त , परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात

विद्यापीठाने जून २०२३ मध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अपेक्षित होते.मात्र,विद्यापीठाने सप्टेंबर महिना अखेरीस अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यापीठाकडून  एमबीएच्या परीक्षांना चार महीने उशीर; विद्यार्थी संतप्त , परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्या (Savitribai Phule Pune University Open and Distance Learning School) माध्यमातून चालवल्या जाणा-या एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा (MBA Course Exams) सुमारे चार महीने उशीराने घेतल्या जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.मात्र,उशीरा का होईना विद्यापीठाला जागा आली असून एमबीए २०२१ पॅटर्नच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या ३ ते १२ ऑक्टोबरपर्यंत नियमीत शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा : शिक्षण NEP 2020 : ‘मल्टिपल एंट्री, एग्झिट’ पर्यायांवर प्रश्नचिन्ह, संसदीय समितीने ठेवले बोट

 विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून वेळेवर परीक्षांचे आयोजन केले जात नाही.तसेच परीक्षांचे निकाल उशीरा लावले जातात, अशी ओरड विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जाते. त्यात मुक्त व दूरस्त अध्ययन प्रशाळेच्या परीक्षांना सुध्दा उशीर होत असल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाने जून २०२३ मध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अपेक्षित होते.मात्र,विद्यापीठाने सप्टेंबर महिना अखेरीस अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.त्यामुळे या परीक्षा ऑक्टोबर महिना अखेरीस किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एमबीए पॅटर्न २०२१ च्या सर्व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना येत्या ३ ऑक्टोबरपासून १२ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.तर १४ ऑक्टोबरपर्यंत विलंब शूलकासह अर्ज भरता येतील.दरम्यान, येत्या जानेवारी महिन्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.त्यामुळे विद्यापीठाला नियमित व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा लवकर घेऊन त्यांचा निकाल जाहीर करावा लागणार आहे. 
----------------