शिक्षण विभागाच्या वादग्रस्त आदेशांची होळी ; शुक्रवारी शाळा बंद ठेवणार 

शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी येत्या १३ ऑक्टोबर रोजी विविध संघटनांकडून पुणे जिल्हाधिकारी व शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.तसेच  शिक्षण विभागाच्या वादग्रस्त आदेशांची होळी केली जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या वादग्रस्त आदेशांची होळी ; शुक्रवारी शाळा बंद ठेवणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण  Group school scheme, school adoption scheme, privatization of schools अशा प्रकारचे  शासन निर्णय काढून महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.त्यामुळे याला विरोध करण्यासाठी व शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी येत्या १३ ऑक्टोबर रोजी विविध संघटनांकडून पुणे जिल्हाधिकारी व शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा (Morcha over the office of Pune District Magistrate and Education Commissioner) काढला जाणार आहे.तसेच  शिक्षण विभागाच्या वादग्रस्त आदेशांची होळी केली जाणार आहे,असे महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर (Shivaji Khandekar) यांनी सांगितले.

पुण्यातील  राष्ट्रसेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन हायस्कूल पर्वती पायथा येथे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे  शनिवारी आयोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये आंदोलनाची व मोर्च्याची रूपरेषा ठरविण्यात आली.तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून,सर्व शिक्षक बंधू भगिनींनी यामध्ये सहभागी होऊन एकमताने हा भव्य मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात केला.

खांडेकर म्हणाले, शनिवार वाड्यापासून मोर्चाला सुरुवात केली जाईल. शिक्षण आयुक्त यांना निवेदन दिल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शासकीय आदेशांची होळी करून मोर्चाची सांगता होईल.त्याचप्रमाणे या आंदोलनामध्ये विद्यार्थी व पालकांना सुद्धा सहभागी करून घेतले जाईल.तसेच जिल्ह्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांच्याकडून या विरोधातील निषेध राज्यपाल यांना पत्राद्वारे पाठविला जाईल.

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीच्या बैठकीस पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जवळपास 30 ते 32 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यात अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे संपादक, शरद जावडेकर,संस्थाचालक महामंडळाचे आप्पा बालवडकर , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे नंदकुमार सागर, हरिश्चंद्र गायकवाड , शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप  , सचिव शिवाजीराव कामथे , महाराष्ट्र राज्य समुपदेशक संघटनेचे विजयराव कचरे , कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष संतोष थोरात, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, महिला अध्यक्षा भारती राऊत, शिक्षकेतर महामंडळाचे  प्रसन्न कोतुळकर ,देवेंद्र पारखे,मान्य खाजगी प्राथमिक महासंघाचे विकास थिटे, शारीरिक शिक्षक महासंघाचे शरदचंद्र धारूरकर, कलाध्यापक संघाच्या अश्विनी कदम. महाराष्ट्र राज्य पदवीधर डीएड संघटनेचे सचिव महादेव माने, जुनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे डॉ.संतोष बिराजदार. माध्यमिक शिक्षक संघ, पुरंदरचे सचिव दत्ता रोकडे , माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्ता हेगडकर आदी  संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.