अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी भरला पहिला भाग

काही विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण केलेली दिसत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रमाणित होणे बाकी असून अनेक विद्यार्थ्यांनी भाग-२ अद्याप भरलेला नाही.

अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी भरला पहिला भाग
11th Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

11th Admission Process : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (Centralised Admission Process) सुमारे ३ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग बरला आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज प्रमाणित केलेले नाहीत. तसेच अनेकांनी भाग दुसराही भरलेला नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दहावीच्या (SSC Result) गुणपत्रिका १४ जूनला मिळणार असून त्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) मिळणार नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीत अर्ज करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

काही विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण केलेली दिसत नाही. तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रमाणित होणे बाकी असून अनेक विद्यार्थ्यांनी भाग-२ अद्याप भरलेला नाही. इयत्ता दहावी राज्य मंडळाचा निकाल जाहीर झालेला असून राज्य मंडळाकडून गुणपत्रिका दिनांक १४ जून रोजी वितरित होणार आहेत.

MPSC Exam : कुणी निकाल लावता का निकाल! चार लाख विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून प्रतिक्षा

गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे व त्यानंतर प्रत्याक्षात इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेता येणार आहे. या सर्व बाबी आणि विद्यार्थी-पालकांची मागणी विचारात घेऊन सध्या सुरू असलेली नियमित फेरी एक साठी अर्ज करण्यासाठी १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्ज भरण्याची स्थिती (१२ जूनअखेरीस)

अर्जाचा भाग एक भरलेले विद्यार्थी – ३ लाख ९१ हजार १४४

अर्ज भरून लॉक केलेले विद्यार्थी – ३ लाख ३५ हजार ३३४

अर्ज व्हेरिफाय केलेले विद्यार्थी – ३ लाख २९ हजार १९८

अर्जाचा भाग दोन भरलेले विद्यार्थी – २ लाख ५२ हजार ४२३

RTE Admission : थकलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची केंद्रीय सचिवच करणार राज्यातील अधिकाऱ्यांना विचारणा

पहिल्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक

दि. १४ जून (सायं. ५ पर्यंत) – अर्जाचा भाग एक भरणे सुरू राहील

दि. १४ जून (रात्री १० पर्यंत) – मार्गदर्शन केंद्रांनी अर्जाचा भाग एक प्रमाणित करणे. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे.

दि. १५ जून (स. १०) – भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे. कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालयांनी जाहीर करणे (शुन्य फेरी)

दि. १५ ते १७ जून (सायं. ६ पर्यंत) – सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दुरुस्ती करणे. कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे. कोटांतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे.

दि. १७ जून – विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्जाचा भाग दोन भरणे सुरू राहील.

दि. १८ ते २० जून – विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी अर्ज करणे. (अगोदर अर्ज केला असला तरी पुन्हा अर्ज करणे.)

दि. २१ जून (स. १०) – नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे. कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर करणे.

दि. २१ ते २४ जून (सायं. ६ पर्यंत) – पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे. कोटांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे. कोटांतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo