अखेर प्रतीक्षा संपली; MHT-CET चा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर

MHT-CET चा निकाल रविवारी १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.

अखेर प्रतीक्षा संपली;  MHT-CET चा  निकाल  थोड्याच वेळात होणार जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५  (Academic year 2024-25) साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी (Engineering, Technology, Agriculture and Pharmaceutical Courses Entrance Test) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेची निकालाची तारीख जाहीर (Result date announced) करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल रविवारी दि.१६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://cetcell.mahacet.org/ निकाल पाहता येणार आहे. 

एमएचटी सीईटीद्वारे २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तेव्हापासून उमेदवारांचे निकाल केव्हा जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. या निकालावर शिक्षणाची पुढील दिशा ठरवली जाते. दरम्यानच्या काळात सीईटी सेलने निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर  सीईटी सेलने काढलेल्या निकालाबाबतच्या प्रसिद्धीपत्रकामुळे सर्व गोष्टींना पुर्णविराम मिळाला आहे. मात्र, निकाल हाती लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची धाकधूक वाढता आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान, तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांमधील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध केले होते. यावर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत मुदत दिली होती. यानंतर सीईटी कक्षाकडून प्रथम जूनच्या पहिल्या आठवड्यात, त्यानंतर निकालाची संभाव्य तारीख १० जून जाहीर केली. त्यानंतर एमएचटी सीईटीचा निकाल १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.

असा पाहा MHT CET 2024 रिझल्ट?

निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org अधिकृत संकेस्थळाला भेट द्या . त्यानंतर Check MHT CET Result 2024  या लिंकवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा. विचारलेला तपशील प्रविष्ट करा. समोर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल. रिजल्ट चेक केल्यानंतर डाऊनलोड करुन त्यांची प्रिंट काढून घ्या.