5th, 8th Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ सप्टेंबरपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज

शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.

5th, 8th Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ सप्टेंबरपासून भरता येणार ऑनलाईन अर्ज
5th and 8th Scholarship Exam 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (MSCE) राज्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (5th, 8th Scholarship Exam) येत्या १ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. परिषदेकडून यावर्षी एक जुलैपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया दोन महिने विलंबाने सुरू होत आहे. (Maharashtra State Council Of Examination)

शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने परिषदेतर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. निकालाची टक्केवारी घटल्याने यंदा परीक्षेची प्रक्रिया एक जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन परिषदेने केले होते. याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, तत्कालीन माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील तसेच तत्कालीन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांची संयुक्तिक बैठक झाली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिषदेला ही प्रक्रिया वेळेत सुरू करता आलेली नाही. याबाबत ‘एज्युवार्ता’ने दि. १ ऑगस्ट रोजी ‘शिक्षण विभागाला स्वत:च्याच निर्णयाचा विसर, शिष्यवृत्ती परीक्षा प्रक्रिया लांबणीवर’ हे वृत्त दिले होते.

निराधारांना शैक्षणिक मदतीचा आधार; शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

फेब्रुवारी २०२३ च्या परीक्षेच्या निकालात काही जिल्ह्यांमध्ये मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले नाहीत. तसेच अनेक जिल्ह्यांचा निकाल पाच ते दहा टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

आता या प्रक्रियाला नियोजनानुसार दोन महिने विलंब झाला आहे. परिषदेकडून आता १ सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. याबाबत परिषदेकडून सर्व जिल्हा परिषदा व महापालिकांना पाठविलेल्या पत्रात ही तारीख नमूद करण्यात आली आहे. तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची अंतिम मुदत तसेच परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ITI News : राज्यातील ‘आयटीआय’मध्ये ७५ व्हर्च्युअल क्लासरूम, स्वातंत्र्यदिनी होणार सुरूवात

दरम्यान, अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसावेत यासाठी जिल्हा परिषदा व महापालिकांनी आपआपल्या स्तरावर उपाययोजना करण्याची विनंतीही बेडसे यांनी केली आहे. यासाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड किंवा मनपा निधीतून भरल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. तसेच या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी परिषदेने निर्मित केलेले मार्गदर्शिका संच आपल्या निधीतून उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंतीही बेडसे यांनी राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांना केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo