आयआयटी मुंबईवर अनुदानाचा वर्षाव; नंदन निलेकणी यांच्यानंतर स्टेट बॅंकेची मोठी घोषणा

IIT बॉम्बे येथे बँकिंग डेटा आणि विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी हा अनुदान देण्यात येत असल्याचे खारा यांनी सांगितले. या केंद्रात १० हजार  चौरस फूट प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे.

आयआयटी मुंबईवर अनुदानाचा वर्षाव; नंदन निलेकणी यांच्यानंतर स्टेट बॅंकेची मोठी घोषणा
IIT Mumbai

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘इन्फोसिस’चे (Infosis) सहसंचालक नंदन निलेकणी (Nandan Nilekani) यांनी  IIT मुंबईला (IIT Mumbai) नुकतेच ३१५ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फाउंडेशनही सरसावली आहे. फाऊंडेशनने IIT मुंबईला २२.५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी ही घोषणा केली. 

IIT बॉम्बे येथे बँकिंग डेटा आणि विश्लेषण केंद्र स्थापन करण्यासाठी हा अनुदान देण्यात येत असल्याचे खारा यांनी सांगितले. या केंद्रात १० हजार  चौरस फूट प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. तसेच डेटा विश्लेषण आणि AI  संशोधन आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत. 

उत्तरपत्रिका तपासण्यास विद्यापीठाकडून उशीर का होतोय? गंभीर माहिती आली समोर

भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रासमोरील   आव्हानांवर तोडगा काढणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्देश असणार आहे.  एसबीआयच्या बँकिंगमधील व्यापक अनुभवाचा आणि IIT बॉम्बेच्या संशोधन कौशल्याचा लाभ हे या उपक्रमा मागचे महत्वाचे उद्देश आहे, असे खारा यांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2