गुजरातचे गोद्रा पुन्हा चर्चेत; NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना बेड्या

याबाबत दाखल केलेल्या 'एफआयआर'च्या माध्यमातून या प्रकरणाचे पुढील धागेदोरे सापडले. एक संपूर्ण केंद्र यामध्ये सहभागी होते, असे तपासातून निदर्शनास आले असल्याचे पोलिस अधीक्षक सोळंकी म्हणाले. 

गुजरातचे गोद्रा पुन्हा चर्चेत;  NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांकडून 5 जणांना बेड्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

गुजरात (Gujrat) मध्ये पंचमहल जिल्ह्यातील गोद्रा (Godhra) च्या एका शाळेत प्रिंसिपल आणि शिक्षक यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 27 विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये (NEET Exam 2024) उत्तीर्ण करण्यासाठी 10 लाखांची लाच (10 lakhs bribe) घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत दाखल केलेल्या 'एफआयआर'च्या माध्यमातून या प्रकरणाचे पुढील धागेदोरे सापडले. एक संपूर्ण केंद्र यामध्ये सहभागी होते, असे तपासातून निदर्शनास आले असल्याचे पोलीस अधीक्षक हिमांशू सोळंकी यांनी सांगितले, म्हणाले.  

 हिमांशू सोळंकी म्हणाले, अटक करण्यात आलेल्यांमध्ये तुषार भट्ट, शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम शर्मा, वडोदराचे शिक्षण सल्लागार परशुराम रॉय, त्याचा सहकारी विभोर आनंद आणि मध्यस्थ आरिफ वोहरा यांचा समावेश आहे.

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गोध्रा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार भट्ट यांच्याकडून ७ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. जय जलाराम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तुषार भट्ट यांची शहरातील NEET साठी उपकेंद्र अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असे नमूद करून अधीक्षक सोळंकी म्हणाले, 'रॉय यांनी त्यांच्या किमान 27 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये घेऊन परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. छाप्यादरम्यान त्याच्या कार्यालयातून आम्हाला 2.30 कोटी रुपयांचे धनादेश सापडले.

ज्या 27 विद्यार्थ्यांनी आधी पैसे भरले होते किंवा रॉय आणि इतरांना पैसे देण्याचे मान्य केले होते, त्यापैकी फक्त तीन उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. एफआयआरनुसार, परीक्षेच्या दिवशी जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी भट्ट यांची चौकशी केली. त्यांची कृती संशयास्पद वाटल्यावर मोबाईल फोन तपासला आणि त्यांना 16 उमेदवारांची नावे, रोल नंबर आणि परीक्षा केंद्रांची यादी सापडली, जी रॉयने त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवली होती.