अखेर चार वर्षाची प्रतीक्षा संपली! मराठावाडा विद्यापीठाचा ' PHD पेट परीक्षा' घेण्याचा निर्णय 

विद्यापीठ प्रशासनाने यंदा पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रिक्त जागांची आकडेवारी काढण्याचे आदेशाने देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. वाल्मीक सरवदे यांनी दिली आहे. 

अखेर चार वर्षाची प्रतीक्षा संपली! मराठावाडा विद्यापीठाचा '  PHD पेट परीक्षा' घेण्याचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) पीएच.डी. प्रवेश चाचणी (Ph.D. Entrance Test) (पेट) परीक्षेसाठी (PET Exam) मागील चार वर्षापासून वाट पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण विद्यापीठ प्रशासनाने यंदा पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रिक्त जागांची आकडेवारी काढण्याचे आदेशाने देण्यात आले असून त्यास विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डाॅ. वाल्मीक सरवदे (Dr. Valmik Sarvade) यांनी दुजोरा दिला आहे. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चार वर्षापूर्वी नोव्हेंबर २०२० मध्ये ऑनलाइन पद्धतीने पेट परीक्षा घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे  पीएच.डी च्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक विद्यार्थी या परीक्षेकडे डोळे लागून बसले होता. मागील दोन वर्षापासून पेट परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांडून करण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात पेट परीक्षा झालीच नाही. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. प्रवेश हे नेट परीक्षेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार नेट परीक्षांचे निकाल तीन टप्प्यांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन पेट परीक्षा घेणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. राज्यातील काही विद्यापीठांनी पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिक्त जागांची आकडेवारी मागवण्यात आली आहे. 

यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. मार्गदर्शकांच्या बाबतीत एक नियम बनवला आहे. त्यास विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नियम लागू झाला आहे. या नियमानुसार फक्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनाच पीएच.डी.चे मार्गदर्शन करता येणार आहे.