नीता प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाची ब्राझिलिया येथे शैक्षणिक विषयांवर बैठक

संयुक्त सचिव (ICC) नीता प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ तीन दिवशीय ब्राझिलिया दौऱ्यावर आहे. यावेळी  शैक्षणिक विषयांवर विविध अंगाने चर्चा केली जाणार आहे.

नीता प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाची ब्राझिलिया येथे शैक्षणिक विषयांवर बैठक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

संयुक्त सचिव (ICC) नीता प्रसाद (Secretary Neeta Prasad) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ (Indian delegation) तीन दिवशीय ब्राझिलिया दौऱ्यावर (Brasilia tours in three days) आहे. यावेळी  शैक्षणिक विषयांवर विविध अंगाने चर्चा (Various discussions on educational topics) केली जाणार आहे. २० ते २२ मे या कालावधीत ब्राझिलिया येथे या शैक्षणिक कार्यगटाची बैठक होत आहे. प्रसाद यांनी भारत सरकारच्या शैक्षणिक व्यावसायिकांच्या क्षमता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान,  आज ‘शिक्षण व्यावसायिकांचे मूल्य आणि क्षमता वाढवणे’ या विषयावर चर्चा झाली. ब्राझिलियाच्या अध्यक्षांनी गेल्या वर्षी भारतीय G20 अध्यक्षपदाच्या काळात शिक्षकांच्या क्षमता वाढीवर भर दिल्याबद्दल कौतुक केले.

बैठकी दरम्यान, प्रसाद यांनी भारत सरकारच्या शैक्षणिक व्यावसायिकांच्या क्षमता वाढीसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. जसे की, एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (ITEP), नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स (NPST), नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग, DIETs of Excellence, NISHTHA यांविषयी माहिती दिली. 

विविध राष्ट्रांतील, विशेषत: ग्लोबल साउथमध्ये IDEPA, SPARC, GIAN, VAJRA आणि ITEC सारख्या उपक्रमांद्वारे भारत विविध देशांतील शैक्षणिक व्यावसायिकांसाठी क्षमता-निर्मिती कार्यक्रमांमध्ये कसे योगदान देत आहे. यावरही त्यांनी प्रकाश टाकला. जगभरातील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी सहयोगी कार्यक्रम विकसित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.