महाराष्ट्रात बारावीत शंभर टक्के गुण मिळवणारी एकमेव तनिषा बोरामणीकर कोण ? 

तनिषा सागर बोरामणीकर हिला एकूण 518 गुण मिळाले असून 18  क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही विद्यार्थिनी 100% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

महाराष्ट्रात बारावीत शंभर टक्के गुण मिळवणारी एकमेव तनिषा बोरामणीकर कोण ? 
Tanisha Sagar Boramanikar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

12th Exam Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे इयत्ता बारावी शंभर टक्के गुण (12th Exam hundred percent marks)मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी छत्रपती संभाजीनगर विभागातील (Chhatrapati Sambhajinagar Division) आहे. तिला एकूण 582 गुण मिळाले असून 18  क्रीडा गुण मिळाले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थिनी 100% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. तनिषा सागर बोरामणीकर (Tanisha Sagar Boramanikar)असे तिचे नाव आहे. तनिषा ही नॅशनल गेम खेळलेली बुध्दीबळ पट्टू आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यात राज्यात एकमेव विद्यार्थिनी 100 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

तनिषा ही छत्रपती संभाजी नगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, पाली व अर्थशास्त्र विषयात शंभर पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी विषयात 89 गुण, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात 95 गुण तर  सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात 98 गुण मिळाले आहेत.

 तनिषा ही बुध्दीबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता.बुद्धीबळाच्या खेळात कामगिरी करणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी दाखवली आहे. 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले असून तिने केवळ अभ्यासतच नाही तर क्रीडा क्षेत्रातही कामगिरी केली आहे.अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीचा बोर्डातर्फे सत्कार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तनिषाच्या आई रेणुका बोरामणीकर म्हणाल्या, तनीषाला अकरावीत असताना नॅशनल गेम्स खळाली.त्यावेळी तिला अभ्यासाला वेळ मिळाला नाही. तसेच बारावीत असतानाही तिला विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागले.त्यामुळे अभ्यासासाठी तिला केवळ एक महिन्याचा कालावधी मिळाला. त्यातही तिने खूप चांगली कामगिरी केली. आम्हा सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता.सध्या तनिषा ही सीए परीक्षेचा अभ्यास करत आहे. तिला सीए व्हायचे आहे. तसेच ती बुध्दीबळ खेळ सुरू ठेवणार आहे.