CBSE बारावीला इंग्रजी आणि हिंदी विषय ऑप्शनला ; 2024-25 साठी नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध 

इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये हिंदी किंवा इंग्रजी दोन भाषांपैकी एक भाषा बंधनकारक असेल. 

CBSE बारावीला इंग्रजी आणि हिंदी विषय ऑप्शनला ; 2024-25 साठी नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने नुकतेच शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नवीन अभ्यासक्रम केले प्रसिद्ध केले आहे. या नवीनअभ्यासक्रमानुसार (New curriculum)12 वी च्या विद्यार्थ्यांना (12th students)इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही पैकी एक भाषा विषय (One language subject)निवडता येईल.

12 वी च्या अभ्यासक्रमात सात मुख्य विषय असतील सामान्य अध्ययन, गणित, विज्ञान, भाषा, मानवता आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासह सात मुख्य विषय आहेत. 2024-2025 च्या वरिष्ठ माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाची रचना खालीलप्रमाणे आहे

1. इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये हिंदी किंवा इंग्रजी दोन भाषांपैकी एक भाषा बंधनकारक असेल. 

2. विद्यार्थी इंग्रजी कोर (कोड-301) आणि इंग्रजी इलेक्टिव्ह (कोड-001) किंवा हिंदी कोर (कोड-302) किंवा हिंदी इलेक्टिव्ह (कोड 002) यापैकी एक भाषा  निवडू शकतील. 

3 - बिझनेस स्टडीज (कोड 054) आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (कोड 833) हे दोन विषय एकत्र घेता येणार नाही.

4 -उमेदवारांना  संगणक विज्ञान/आयटी-संबंधित विषयांपैकी फक्त एक निवडण्याची परवानगी आहे, ज्यामध्ये माहितीशास्त्र सराव (065), संगणक विज्ञान (कोड 083), आणि माहिती तंत्रज्ञान (कोड 802) यांचा समावेश आहे.

5. याव्यतिरिक्त, उमेदवार आणखी एक पर्यायी विषय देऊ शकतो, जो पर्यायी स्तरावर इतर कोणताही वैकल्पिक विषय किंवा भाषा असू शकतो. अभ्यासाच्या आराखड्यानुसार, कोणताही विषय कौशल्य वैकल्पिक विषयाशी जोडला जाऊ शकतो.

6. 6/7 विषय घेणाऱ्या आणि सर्व 6/7 विषय उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची टक्केवारी कॉलेज/संस्थेच्या धोरणांच्या आधारे निश्चित केली जाईल.
सात पैकी सहा विषय घेणाऱ्या आणि प्रत्येक उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची टक्केवारी उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करत असलेल्या कॉलेज किंवा संस्थेच्या आवश्यकतेनुसार निश्चित केली जाईल.