बारावी पुरवणी परीक्षा 2024 : २७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार

अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. 

बारावी पुरवणी परीक्षा 2024 : २७ मे पासून ऑनलाईन अर्ज  भरता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Boards of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (Failed students) बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 27 मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार (Application can be filled online) आहे. 

पुरवणी परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज भरायचा आहे. तसेच अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख 31 मे ते 15 जून 2024 अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख 18 जून आहे. 

सोमवार 27 मे पासून शुक्रवार 7 जून 2024 या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. तर 8 जून ते 12 जून या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

इयत्ता 12 वी च्या परीक्षेच्या निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत समुपदेशक विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील.

समुपदेशकांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत

7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902 आणि 9011302997 आहेत.