शिक्षण विभागाची ‘स्वच्छता’ मोहिम; पाऊण लाख तक्रारी निकाली, सात हजार फायली रद्दीत

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सध्या प्रलंबित तक्रारी, विविध प्रकरणे निकाली काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालयातील विविध विभागांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जात आहे.

शिक्षण विभागाची ‘स्वच्छता’ मोहिम; पाऊण लाख तक्रारी निकाली, सात हजार फायली रद्दीत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या मोहिमेअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Union Ministry) मागील नऊ महिन्यांत तब्बल पाऊण लाखांहून अधिक प्रलंबित तक्रारी निकाली काढल्या आहेत. तसेच निकाली निघालेल्या प्रकरणांच्या जुन्या फायलीही रद्दीत काढण्यात आल्या आहे. या फायलींची संख्या सात हजारांहून अधिक आहे.

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून सध्या प्रलंबित तक्रारी, विविध प्रकरणे निकाली काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालयातील विविध विभागांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेला पहिला टप्पा डिसेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत पार पडला. याबाबतची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कुलसचिव, अधिष्ठातांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे धुळखात; बकोरियाही हतबल

 

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ९७.९१ टक्के सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. मंत्रालयाकडे आलेल्या ७७ हजार २१ तक्रारींपैकी ७५ हजार ४१० तक्रारी निकाली काढल्या आहेत. खासदारांकडून प्राप्त झालेल्या संदर्भांपैकी ८८.६७ टक्के निकाली काढले आहेत. सुमारे २३०० संदर्भ व पत्र मंत्रालयाकडे आली होती.

 

 

सावर्जनिक तक्रारींपैकी अपील करण्यात आलेल्या २१ हजार ८१० म्हणजे ९९.९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात  आल्या आहेत. केवळ दोन तक्रारींचे अपील बाकी असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्रालयाने सर्व ७ हजार १५२ फायलीही काढून टाकल्या आहेत. मंत्रालयाने ४८२ ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविले.

 

प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी मंत्रालयाकडून संबंधित विविध कार्यालये व संलग्न संस्थांमध्ये हे अभियान राबवत आहे. दि. २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतही प्रलंबित प्रकरणे कमी करणे, संस्थात्मक स्वच्छता करणे, अंतर्गत देखरेख यंत्रणा मजबूत करणे आणि रेकॉर्ड व्यवस्थापन सुधारणे यासाठी मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j