Harsha Pisal : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका!

पुण्यातील आपटे रस्त्यावरील लक्ष्मणराव आपटे प्रशालेत (Laxman Rao Apte Prashala) सहाय्यक शिक्षिका असलेल्या हर्षा पिसाळ यांना राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

Harsha Pisal : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानातून बाहेर पडत कृतीशील शिक्षणाला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP 2020) अनेक नाविण्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पण त्याआधीच अनेक शिक्षकांकडून कृतीतून शिक्षण या संकल्पनेच्या आपल्या शाळेमध्ये अंमलबजावणी करत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात हातभार लावत आहेत. त्यापैकी हर्षा पिसाळ (Harsha Pisal) हे एक नाव.

 

पुण्यातील आपटे रस्त्यावरील लक्ष्मणराव आपटे प्रशालेत (Laxman Rao Apte Prashala) सहाय्यक शिक्षिका असलेल्या हर्षा पिसाळ यांना राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त हर्षा पिसाळ यांनी ‘एज्युवार्ता’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, जेव्हा विद्यार्थी एखाद्या कृतीमध्ये मग्न होतात, तेव्हा त्यातून त्यांना आनंद मिळत असतो. त्यामुळे आनंददायी शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्गात वेगेवेगळे उपक्रम घेत शिक्षण दिले तर ते विद्यार्थ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरते.  

Mrunal Ganjale : मृणाल गांजाळे का ठरल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी?

हर्षा पिसाळ या शाळेत विद्यार्थ्यांची कुवत ओळखून तशा पद्धतीने उपक्रम घेत असतात. तसेच वाचनाचा वेग वाढवण्यासाठी त्या नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतात. गणिताची पेटी, उपकरणे बनवून सोप्या पद्धतीने गणित शिकविण्यावर त्यांचा भर असतो. तसेच विद्यार्थ्यांचा संशोधनातील सहभाग वाढावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत.

 

हा पुरस्कार मला शाळेला अर्पण करायचा आहे. कारण या शाळेने केलेल्या सहकार्यामुळेत विद्यार्थ्यांसाठी मला नवनवीन उपक्रम राबवता आले, अशी भावना व्यक्त करून पिसाळ म्हणाल्या, विद्यार्थी हा शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ गुणात्मक विकासकडेच लक्ष न देता त्यांच्या भावनिक आणि सामजिक विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरेजचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राष्ट्रविकासाला महत्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांनी सहजीवन अंगीकारले पाहीजे आणि त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत केली पाहीजे.

बालभारती तर्फे आयोजित एकात्मिक पाठ्यपुस्तकातील वहीच्या कोऱ्या पृष्ठांच्या प्रभावी वापरा संदर्भातील सूचनांचे परिपत्रक बनवण्यात पिसाळ यांचा सहभाग होता. इन्स्पयार अवॉर्ड, विज्ञान प्रदर्शन, निबंध, भाषण, क्रीडा अशा विविध स्पर्धांना त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या 'मसाला माती' या प्रकल्पाची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. तसेत ज्ञानप्रबोधिनी तर्फे आयोजित कॉम्प्युटर इंटेलिजंट टेस्ट लेसन प्लॅन कॉन्टेस्टमध्ये 'वर्ग स्वच्छता' या त्यांनी केलेल्या पावर पॉइंट प्रेझेंटेशनलाही राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी यापूर्वी त्यांचा पुणे महानगरपालिका व शिक्षण मंडळ पुणे तर्फे गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j