MPSC News : टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत आयोगाने दिली महत्वाची अपडेट

लिपिक-टंकलेखन तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीसाठी संगणक प्रमाणीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणीच घेतली जाणार आहे.

MPSC News : टंकलेखन कौशल्य चाचणीबाबत आयोगाने दिली महत्वाची अपडेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गाच्या परीक्षांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) लागू करण्यात आली आहे. याअनुषंगाने आयोगाने या चाचणीबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संबंधित संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी व इतर बाबींचा विचार करून हे निर्णय घेतल्याचे आयोगाने म्हटले आहे.

 

लिपिक-टंकलेखन तसेच कर सहायक या संवर्गातील पदभरतीसाठी संगणक प्रमाणीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणीच घेतली जाणार आहे. ही चाचणी केवळ अर्हताकारी किंवा पात्रता स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या भरावयाच्या पदांच्या तीनपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येतील, असे असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठे, महाविद्यालयांना आता 'ही' माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक; वाचा संपूर्ण यादी

 

लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी मुख्य परीक्षेस अर्ज करताना उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीपैकी कोणतीही एक टंकलेखन चाचणी निवडता येईल. उमेदवारांनी निवड केलेल्या मराठी किंवा इंग्रजी चाणी आयोगातर्फे घेण्यात येईल व त्या चाचणीमध्ये पात्र ठरणे आवश्यक असेल. तसेच कर सहायक संवर्गासाठी उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही चाचणीमध्ये पात्र ठरणे आवश्यक असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना  नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी व दोन संधी अनुज्ञेय असल्यामुळे संबंधित आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन चाचणी बंधनकारक नाही, असे आयोगाने नमूद केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k