जागतिक बँकेकडून देशातील तंत्रशिक्षण संस्थांना २५५.५ दशलक्ष डॉलरचे कर्ज

भारताला तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी वाढवण्यासाठी २५५.५ दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले.

जागतिक बँकेकडून देशातील तंत्रशिक्षण संस्थांना २५५.५ दशलक्ष डॉलरचे कर्ज
World Bank Loan to India

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतातील तांत्रिक शिक्षण (Technical Admission) देणाऱ्या संस्थांच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे, त्यांना रोजगाराच्या (Employment) अधिकाधिक संधी मिळाव्यात, या उद्देशाने जागतिक बँकेने (World Bank) शासकीय तांत्रिक संस्थांना (Government Technical Education) तब्बल २५५.५ दशलक्ष डॉलर एवढे कर्ज मंजूर केले आहे. देशातील निवडक २७५ शासकीय तंत्रशिक्षण संस्थांना (Technical Education Institutes) पुढील पाच वर्षात हे कर्ज देण्यात येणार आहे.

दरवर्षी सुमारे ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना या कर्जाचा लाभ होणार आहे. यासंदर्भात जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.  "भारताला तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी वाढवण्यासाठी २५५.५ दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले. ही गुंतवणूक भारतातील शैक्षणिक विकासासाठी जागतिक बँकेची वचनबद्धता दर्शवते," असे या निवेदनात म्हटले आहे. 

तलाठी भरती : दिव्यांग आरक्षणावरून विद्यार्थ्यांमध्ये खदखद, विरोध वाढण्याचे चिन्ह

तंत्रशिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पांतर्गत, विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे, संशोधन क्षमता सुधारणे, उद्योजकता आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, तांत्रिक संस्थांचे प्रशासन सुधारणे, विद्यार्थ्यांना प्रगत अभ्यासक्रमांतर्गत संप्रेषण आणि हवामानातील लवचिकता यामध्ये  उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश, याव्यतिरिक्त अधिक चांगल्या इंटर्नशिप आणि प्लेसमेंट उपलब्ध करून  विद्यार्थ्यांचा विकास हा या कर्जाचा मुख्य उद्देश आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील पालकांची लूटमारही थांबवा! पालक संघटनेची सरकारकडे मागणी

भारतातील महाविद्यालये, विद्यापीठे व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०११-१२ मधील २९ दशलक्ष विद्यार्थ्यांवरून ही संख्या २०१९-२० मध्ये ३९ दक्षलक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली आहे. तर संस्थांचा आकडा ४० हजारांवर गेला आहे. देशातील शिक्षण क्षेत्र जगात सर्वात मोठे आहे. पण तर्क, संघर्ष निराकरण आणि परस्पर संवाद आदी कौशल्यांमध्ये तफावत असल्याने त्यासाठी कर्ज मंजूर केल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2