शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा; तब्बल ८३० बनावट मदरशांच्या नावाने लाटले १४५ कोटी

देशातील सुमारे ५३ टक्के संस्था बनावट किंवा कार्यरत नाहीत. या संस्थांनी मागील ५ वर्षात बनावट विद्यार्थ्यांची नोंद करून १४५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.  

शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा; तब्बल ८३० बनावट मदरशांच्या नावाने लाटले १४५ कोटी
Scholarship Scam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिष्यवृत्ती योजनेत (Scholarship Scheme) मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. देशातील १ हजार ५७२ मदरशांपैकी तब्बल ८३० मदरसे केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे. मदरसे (Madrasa) आणि बनावट विद्यार्थ्यांच्या (Students) नावाने कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती बँक खात्यातून काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या (Minority Ministry) चौकशीत शिष्यवृत्ती योजनेत घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अल्पसंख्याक मंत्रालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवला आहे. हा घोटाळा सुमारे १४५ कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Scholarship Scam)

समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे ५३ टक्के संस्था बनावट किंवा कार्यरत नाहीत. या संस्थांनी मागील ५ वर्षात बनावट विद्यार्थ्यांची नोंद करून १४५ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) ने केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. सरकारने सध्या ८३० बनावट संस्थांची बँक खाती गोठवली आहेत. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात गेल्या ४ वर्षांत ८ लाख मुलांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा चौकशी अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश

आसाममधील नागाव येथील बँकेच्या शाखेत एकाच वेळी ६६ हजार शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली. असेच काश्मीरमधील अनंतनाग पदवी महाविद्यालयाचे प्रकरण समोर आले. महाविद्यालयात एकूण ५ हजार विद्यार्थी आहेत, मात्र ७ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढत फसवणूक केली जात आहे. मदरसा आणि अल्पसंख्यांक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पहिली ते पीएचडीपर्यंत ही शिष्यवृत्ती दिली जाते. या अंतर्गत प्रति विद्यार्थ्याला ४ हजार ते २५ हजार रुपये दिले जातात. सुमारे १ लाख ३२ हजार मुले वसतिगृहात  राहत नसतानाही त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे २२ हजार कोटी रुपये शिष्यवृत्ती म्हणून जारी केले आहेत. यामध्ये गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी २ हजार २३९ कोटी रुपये दिले जात आहेत. 

देशातील १२ लाख बँक शाखांमधील प्रत्येक शाखेतील ५ हजाराहून अधिक मुलांकडे शिष्यवृत्तीचे पैसे जात होते. देशात १ लाख ७५ हजार मदरसे आहेत. त्यापैकी केवळ २७ हजार मदरसे नोंदणीकृत आहेत. तेच केवळ शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo