विद्यापीठात सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे.

विद्यापीठात सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या सभोवतालच्या परिसरातील सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी  (VC Dr. Suresh Gosavi) यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी प्र -कुलगुरु डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य आदी उपस्थित होते.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ठराव संकेतस्थळावर टाकणार

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याशेजारी हे सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे. या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित महिला आणि विद्यार्थांना प्रेरणा देणारे भित्तीचित्रे तयार करण्यात येणार आहेत. तसेच पुतळ्याशेजारील बगीच्याचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे. बागेच्या परिसरामध्ये पदभ्रमण करण्यासाठी मार्ग तयार करून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या पुतळ्याशेजारी विविध समारंभ व कार्यक्रमांसाठी बैठकीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी पावने दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले.