NEET PG   साठी इंटर्नशिप कट ऑफ वाढणार का ?; सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल

सरन्यायाधीश (CJI) D.Y. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने  'इंटर्नशिप कट-ऑफ' वाढवण्याची याचिका फेटाळून लावली आहे.

NEET PG   साठी इंटर्नशिप कट ऑफ वाढणार का ?; सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) PG या येत्या 23 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी 'इंटर्नशिप कट-ऑफ' (Internship Cut-off)वाढवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश (CJI) D.Y. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने  'इंटर्नशिप कट-ऑफ' वाढवण्याची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

CJI चंद्रचूड म्हणाले, 'मला असे म्हणायचे आहे की जेव्हा "कट-ऑफ" असेल तेव्हा लोक एका विशिष्ट मर्यादेत  बांधील असतात.  याचिका फेटाळताना खंडपीठाने म्हटले की, ' हे मुद्दे पूर्णपणे धोरणाच्या कक्षेत येतात. NEET PG साठी बसलेल्या उमेदवारांसाठी इंटर्नशिपसाठी सध्याची ‘कट-ऑफ’ तारीख 15 ऑगस्ट आहे.

NEET PG 2024 23 जून 2024 रोजी होणार आहे. इंटर्नशिपसाठी सध्याची कट-ऑफ तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे. यापूर्वी, NEET-MDS साठी इंटर्नशिप कट ऑफ वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेला उत्तर देताना, केंद्राने मार्चमध्ये न्यायालयाला कळवले की NEET MDS साठी कट ऑफ 31 मार्च ते 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.