तयारीला लागा ; राज्य राखीव पोलीस बल, मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर 

जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणिक करण्याबाबत राज्य शासनाकडून पत्र पाठवण्यात आले आहेत. पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२३ साठी मैदानी चाचणी येत्या ६ जून २०२४ पासून सुरू होत आहे.

तयारीला लागा ; राज्य राखीव पोलीस बल, मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील निवडणुकीचे वातावरण थंड होताच, राज्य राखीव पोलीस बल (State Reserve Police Force) मैदानी चाचणीला सुरुवात (Field testing begins) करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्या अंतर्गत भरती प्रक्रिया पार पडत आहे, येथील जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणिक (District Grounds Reserve) करण्याचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. पोलीस भरती प्रक्रिया २०२२-२३ करिता मैदानी चाचणी येत्या ६ जून २०२४ पासून सुरू (Field Trial to start from 6th June 2024) होत आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या उमेदवारांना आता कामाला लागवे लागणार आहे. 

राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन २०२२-२३ ही येत्या ६ जून २०२४ रोजी सुरु होत आहे. त्या अनुषंगाने गटामध्ये सशस्त्र पोलीस  भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करिता ५ किमी धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक यासाठी ४ मैदाने तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती पत्राकाद्वारे देण्यात आली आहे.