सीईटीच्या निकालाला मुहूर्त सापडेना; पीसीएम,पीसीबी ग्रुपचा निकाल पुढे ढकलला 

येत्या 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

सीईटीच्या निकालाला मुहूर्त सापडेना; पीसीएम,पीसीबी ग्रुपचा निकाल पुढे ढकलला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell)घेण्यात आलेल्या पीसीएम व पीसीबी ग्रुप परीक्षेचा निकालाची (PCM and PCB Group Exam Result)नवीन तारीख जाहीर केली आहे. येत्या 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा सीईटी सेलच्या संकेतस्थळावर (website of CET Cell)जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे सीईटी परीक्षेच्या निकालाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. 

सीईटी सेल तर्फे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.त्यामुळे आपण दिलेल्या प्रवेश पूर्व परीक्षांचा निकाल केव्हा जाहीर होणार, यांचा अंदाज विद्यार्थ्यांना आला होता.परंतु,नुकतेच सीईटी सेलने  पीसीएम व पीसीबी ग्रुप परीक्षांचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या 19 जून पर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे किंवा त्यापूर्वी सुध्दा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

राज्यातील पीसीबी ग्रुपच्या 3 लाख 41 हजार 765 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.त्यातील 2 लाख 95 हजार 576 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर पीसीएम ग्रुपच्या नोंदणी केलेल्या 4 लाख 11 हजार 173 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 79 हजार 868 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 75 हजार 444 एवढी असून सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सीईटी सेलने काही दिवसांपूर्वी 12 जून ही निकालाही तारीख दिली होती.आता 19 जून ही नवीन तारीख दिली आहे.त्यामुळे निकाल जाहीर करण्यास एवढा विलंब का केला जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. 
----------------------------------------