Talathi Bharti : पेपरफुटीनंतर आता सर्व्हर डाऊन, यात काही काळंबेरं आहे?

तलाठी भरतीसाठी राज्यभरातील तब्बल १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याने आधीच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

Talathi Bharti : पेपरफुटीनंतर आता सर्व्हर डाऊन, यात काही काळंबेरं आहे?
Talathi Bharti 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra Recruitment : राज्यात तलाठी भरतीची (Talathi Bharti) परीक्षा सुरू असून पहिल्याच दिवशी पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. आता सर्व्हर डाऊनमुळे (Server Down) सोमवारी सकाळी राज्यात ठिकठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परीक्षा वेळेत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक केंद्रांबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी झाली असून पेपरपुटीची (Paper Leak) भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी यात काही काळंबेरं आहे?, अशी शंका व्यक्त केली आहे. 

तलाठी भरतीसाठी राज्यभरातील तब्बल १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याने आधीच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. हायटेक कॉपी प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून ही परीक्षा स्थगित करून टीसीएस आयऑन केंद्रांवरच घेण्याची मागणी केली जात आहे. त्यातच सोमवारी सर्व्हर डाऊन झाल्याने आणखी गोंधळ वाढला आहे.

YCMOU Admission : विद्यापीठाची कमाल, शुल्कवाढ होऊनही विद्यार्थ्यांचा ओढा वाढला

सकाळी नऊ वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचल्यानंतर सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगण्यात आले. नागपूरसह अमरावती, पुणे, अकोला, औरंगाबाद व आणखी काही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांना बराच वेळ बाहेर ठेवण्यात आल्याने आता सरकारविरोधात संघटनांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

Tcs कंपनी चे सर्व्हर डाऊन झाले. आपल्याकडून एक हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. यांना एवढे शुल्क देऊन फायदा काय? हे पेपरफुटी थांबऊ शकत नाहीत, हे पेपर नीट घेऊ शकत नाही. यांचा सर्व्हर डाऊन होतंय, हे सर्व संशयास्पद आहे यांची चौकशी ही झाली पाहिजे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना पाहा - https://www.youtube.com/shorts/JCDwNJZcx8Y

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून संताप व्यक्त केला आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी म्हटले आहे की, तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?.”

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo