CBSE- CTET परीक्षेचा निकाल जाहीर

गुणपत्रिका, पास प्रमाणपत्रे डिजीलॉकरद्वारे नंतर प्रसिद्ध केली जाईल.

CBSE- CTET परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

cbse ctet result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता (CBSE CTET 2024) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. सीबीएसईतर्फे 18 वी CTET परीक्षा 21 जानेवारी रोजी घेण्यात आली होती. तसेच तात्पुरती उत्तर सूची 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

उमेदवारांचे गुण (CBSE CTET स्कोअरकार्ड) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. विद्यार्थी  रोल नंबरच्या मदतीने आपले गुण तपासू शकतात. गुणपत्रिका, पास प्रमाणपत्रे डिजीलॉकरद्वारे नंतर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेसाठी एकूण 26 लाख 93 हजार 526 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 84 टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली. एकूण नोंदणीकृत उमेदवारांपैकी 9 लाख 58 हजार 193 पेपर 1 (इयत्ता 1-5) आणि 17लाख 35 हजार 333 पेपर 2 (इयत्ता 6 ते 8) साठी परीक्षा दिली. 

मार्कशीट डिजीलॉकरवर, सीबीएसई सीटीईटी मार्कशीट डिजीलॉकरवर उपलब्ध असेल. 
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) जानेवारी 2024 च्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे DigiLocker द्वारे प्रदान केली जातील. बोर्डाने म्हटले आहे की परीक्षेस  बसलेल्या सर्व उमेदवारांची डिजीलॉकर खाती तयार केली जातील आणि त्यांना CBSE कडे नोंदणीकृत मोबाइल नंबरवर लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळतील.


असा करा निकाल डाउनलोड 
* अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट द्या.
* CTET जानेवारी 2024 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी लिंक उघडा.
* तुमची लॉगिन क्रेडेंशियल एंटर करा - अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख.
* CTET जानेवारी 2024 परीक्षेचा निकाल तपासा आणि डाउनलोड करा.