CET Cell 2024 : B.Ed / M.Ed / B.P.Ed / M.P.Ed प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर 

उमेदवारांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देवून आपला निकाल पाहता येणार आहे.

CET Cell 2024 : B.Ed / M.Ed / B.P.Ed / M.P.Ed प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test cell) B.Ed / M.Ed / B.P.Ed / M.P.Ed या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. उमेदवारांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देवून आपला निकाल पाहता येणार आहे. उमेदवाराची गुणपत्रिका त्याच्या लाॅगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहित सीईची सेलने प्रसिध्दी केलेल्या पत्रकात नमूद केली आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये बी. एड, एम.एड, बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे. इतर प्रवेश परीक्षांचे निकाल पुढील काळात टप्प्याटप्प्याने  जाहीर होतील. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून गुणपत्रिका प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा उमेदवारांना लागणार आहे. 

निकाल कसा तपासावा?

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cetcell.mahacet.org  या अधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील पोर्टल लिंकवर क्लिक करा. यानंतर चेक एमएचटी सीईटी निकाल 202४ च्या लिंकवर जा. पुढच्या पानावर रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

सीईटी परीक्षांच्या निकालानंतर आता प्रवेश फेरीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत. राखीव जागांसाठी जात वैधता प्रमाणपत्रापासून अन्य विविध आरक्षणांसाठी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे पुढील काळात उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.