सेट परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती का ; 85 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला हजर ; शेवटची ऑफलाईन परीक्षा

सेट परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे 80 टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहत होते.मात्र,रविवारी झालेल्या सेट परीक्षेस 85 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिल्याने 5 टक्के उपस्थिती वाढल्याचे दिसून आले.

सेट परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती का  ; 85 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला हजर ; शेवटची ऑफलाईन परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी रविवारी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेला (set exam) सर्वाधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.यंदा सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थी परीक्षेस उपस्थिती होते. तर 19 हजार 89 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले.उपस्थितीची आकडेवारी विचारात घेता 85.11 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.आत्तापर्यंतच्या परीक्षांची विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेता ही सर्वाधिक आकडेवारी आहे.दारम्यान, विद्यापीठातर्फे शेवटची ऑफलाईन परीक्षा (Final Offline Exam)घेतली जाणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असावी असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.

 महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रमुख 17 शहरांमधील 298 परीक्षा केंद्रांवर (exam centers) आयोजित करण्यात आली होती.युजीसीच्या (UGC)मार्गदर्शन सूचनानुसार विद्यापीठातर्फे ही शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा घेण्यात आली. युजीसीच्या निर्देशानुसार विद्यापीठाकडून पुढील सर्व परीक्षा या नेट प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने आयोजित कराव्या लागणार आहेत.पुणे विद्यापीठाने आत्तापर्यंत 38 सेट परीक्षा घेतल्या असून 7 एप्रिल रोजी 39 वी सेट परीक्षा घेण्यात आली.त्यात गोंदिया शहरात सर्वाधिक 89.84 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.चंद्रपूरमध्ये 89.72 टक्के तर कोल्हापूर शहरात 88.99 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.पुणे शहरातील परीक्षा केंद्रांवर 79.64 टक्के तर मुंबईतील परीक्षा केंद्रात 82.05 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. 

विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठातर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी सर्वसाधारणपणे 80 टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहत होते.मात्र,रविवारी झालेल्या सेट परीक्षेस 85 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहिल्याने 5 टक्के उपस्थिती वाढल्याचे दिसून आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे म्हणाले, महाराष्ट्र गोवा राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा सुरळीतपणे पार पडली.परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांपैकी 85.11 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. 
-----------------------------------

सेट परीक्षेची शहरनिहाय उपस्थितीची टक्केवारी 
मुंबई 79.64 ,पुणे 82.05 ,कोल्हापूर 88.99 ,नाशिक 86.84 ,जळगाव 87.09 ,छत्रपती संभाजीनगर 84.17 ,नांदेड 85.34 ,अमरावती 88.48 ,नागपूर 85.09 ,गोवा 86.55 ,सोलापूर 83.75 ,चंद्रपूर 89.72 ,गडचिरोली 89. 84 ,अहमदनगर 87.21 ,धुळे 86.46 रत्नागिरी 86.42 ,परभणी 87.35