ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर लगेच भरा अर्ज; उद्या शेवटची मुदत

आयटीआय प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर रिक्त जागांवर प्रवेशासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेऱ्या सुरू असून आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर लगेच भरा अर्ज; उद्या शेवटची मुदत
ITI Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून (DVET) राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. त्याअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशासाठी चौथी समुपदेशन फेरी (Counselling Round) सुरू असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ७ ऑक्टोबर ही आहे. त्यामुळे आता प्रवेशासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. (ITI Admission News) 

आयटीआय प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर रिक्त जागांवर प्रवेशासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेऱ्या सुरू असून आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. जून महिन्यातच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही आयटीआय संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारी कामाचे धिंडवडे; उद्घाटनापुर्वीच ढासळले मुलींच्या वसतिगृह इमारतीचे छत

 

प्रवेशासाठी अजूनही ऑनलाईन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही नव्याने नोंदणी करता येणार आहे. ही प्रक्रिया दि. ५ ऑक्टोर रोजी सुरू झाली आहे. तर दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मुदतीत अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या समुपदेशन फेरीत सहभागी होण्यासाठी या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

 

याच कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे, अर्ज निश्चिती आदी कामे करावी लागतील. दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. तर दि. ८ ते १० ऑक्टोबर यादरम्यान नोंदणीकृत तथा अप्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेश प्रवेश फेरीसाठी व्यक्तिश: संस्थेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या सुरूवातीलाच नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत दि. १० ऑक्टोबरपर्यंत रिक्त जागांनुसार संस्थेत जाऊन प्रवेश घेता येईल. याच कालावधीत संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खाजगी संस्थांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित संस्थांना संस्थास्तरावर भरण्यासाठी उपलब्ध होतील.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k