CBSE : दहावी-बारावी परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका प्रसिध्द, विद्यार्थ्यांना करता येणार सराव

विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेची तयारी करता यावी, कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत, याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा या उद्देशाने मंडळाने नमुना प्रशपत्रिका प्रसिध्द केल्या आहेत.

CBSE : दहावी-बारावी परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका प्रसिध्द, विद्यार्थ्यांना करता येणार सराव
CBSE Sample Question Paper

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नुकतेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे (10th-12th Examination) वेळापत्रक जाहीर केले आहे. आता मंडळाकडून परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका (Sample Question Paper) प्रसिध्द करण्यात आल्या आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (CBSE released 10th-12th Exam Model Papers)

विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेची तयारी करता यावी, कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत, याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा या उद्देशाने मंडळाने नमुना प्रशपत्रिका प्रसिध्द केल्या आहेत. दरम्यान सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. सन्यम भारद्वाज यांनी केलेल्या घोषणेनुसार, १० वी च्या  परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च पर्यंत दरम्यान घेतल्या जाणार आहेत तर १२ वी च्या परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल  या कालावधीत होणार आहेत. 

धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

दहावी व बारावीच्या परीक्षा अंदाजे ५५ दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. दोन्ही वर्गांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. CBSE बोर्डाकडून परीक्षे संदर्भातील पत्रक संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवण्यात आल्या आहेत. या तारखांनुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन ही बोर्डाकडून करण्यात आले आहे.

अशा पाहा नमुना प्रश्नपत्रिका

 * सर्व प्रथम नमुना प्रश्नपत्रिका टॅब उघडा आणि नंतर SQP 2023-24 वर क्लिक करा.

*  आता वर्ग आणि विषय निवडा.

*  यानंतर CBSE बोर्ड 2024 नमुना पेपर PDF उघडेल.

* सेव्ह करून डाउनलोड करा आणि सराव करा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD