QS World Ranking : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण, देशात १६ व्या क्रमांकावर

टाईम्स रँकिंगप्रमाणेच पुणे विद्यापीठ महाराष्ट्रात आयआयटी मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मागील वर्षी क्यूएस रँकिंगमध्ये विद्यापीठ ५४१-५५० दरम्यान होते.

QS World Ranking : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मोठी घसरण, देशात  १६ व्या क्रमांकावर
QS World University ranking

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (QS World University Ranking) मध्ये देशात IIT Mumbai पहिल्या क्रमांकावर आले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी विद्यापीठाचे रँकिंग ५४१ ते ५५० दरम्यान होते. यंदा मात्र विद्यापीठाचा रँक २०० ने कमी झाला आहे. त्यामुळे टाईम्स रँकिंगमध्ये (Times Ranking) दिलासा मिळाल्यानंतर क्यूएस रँकिंगमध्ये विद्यापीठाला झटका बसला आहे.   

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२४ जाहीर झाली असून अमेरिकेतील ‘एमआयटी’ संस्था अव्वल ठरली आहे. तर केंब्रिज विद्यापीठ दुसऱ्या, ऑक्सफर्ड विद्यापीठ तिसऱ्या, हार्वर्ड विद्यापीठ चौथ्या आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ पाचव्या आणि लंडनचे इंपिरियल कॉलेज सहाव्या स्थानावर आहे.

Maharashtra SET result 2023 : केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र, पाहा विषय आणि प्रवर्गनिहाय कटऑफ?

भारतातील ४५ विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळाले आहे. यावेळी पहिल्या २०० मध्ये दोन, ३०० मध्ये सहा आणि ५०० च्या यादीत ११ विद्यापीठे आहेत. यामध्ये आयआयटी आणि इतर केंद्रीय शैक्षणिक संस्थांचाच समावेश आहे. दिल्ली विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठाने प्रथमच जगातील पहिल्या ५०० च्या यादीत स्थान मिळवले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात १६ व्या क्रमांकावर असून ७११ ते ७२० रँकिंग आहे. तर मुंबई विद्यापीठाला ७५१ ते ७६० रँकिंग मिळाले आहे. टाईम्स रँकिंगप्रमाणेच पुणे विद्यापीठ महाराष्ट्रात आयआयटी मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मागील वर्षी क्यूएस रँकिंगमध्ये विद्यापीठ ५४१-५५० दरम्यान होते.

विद्यार्थ्यांनो, राहण्या व जेवणाच्या खर्चाची चिंता सोडा! राज्य सरकार भागवणार खर्च

आयआयटी बॉम्बे, गुवाहाटी, दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, आयआयटी भुवनेश्वर, पंजाब विद्यापीठ, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, व्हीआयटी यांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. तर आयआयएसी बंगलोर, आयआयटी दिल्ली, खरगपूर, कानपूर, मद्रास, इंदूर, हैदराबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, ओपी जिंदाल, जामिया मिलिया इस्लामिया यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रँकिंग

वर्ष        रँकिंग

२०२४   ७११-७२०

२०२३   ५४१-५५०

२०२२   ५९१-६००

२०२१   ६५१-७००

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2