व्यवसाय शिक्षण भरती : कागदपत्रे पडताळणीआधीच गुणवत्ता यादीतून नावे कमी? विभागाचे स्पष्टीकरण

संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सामायिक परीक्षा घेण्यात आली.

व्यवसाय शिक्षण भरती : कागदपत्रे पडताळणीआधीच गुणवत्ता यादीतून नावे कमी? विभागाचे स्पष्टीकरण
Dvet Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत (DVET) गट – ‘क’ संवर्गाची पदभरती (Recruitment) अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी स्पष्ट केले आहे. पदभरतीमधील प्रमाणपत्र अथवा कागदपत्र पडताळणीची (Document Verification) प्रक्रिया अद्याप झालेली नसताना तत्पूर्वीच काही उमेदवाराची नावे गुणवत्ता यादीतून कमी करण्याबाबतची माहिती चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध ७७२ पदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर १६ एप्रिल रोजी सामायिक परीक्षा घेण्यात आली. जाहिरातीमधील निदेशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) पदांकरिता व्यावसायिक चाचणी (CBT-2) असल्याने ही पदे वगळता उर्वरित सर्व पदांची (Group-B व Group-C) तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) दि. १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद भरती : आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता! गिरीष महाजनांनी केले सतर्क

ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेले आहेत, अशा उमेदवारांनी त्या-त्या गटा (Group) करिता असलेली सामायिक परीक्षा (CBT) स्वतंत्रपणे दिलेली असल्याने अशा उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार संगणकीकृत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत समावेश आहे. उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करुन निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Documents Verification) ची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. तथापि, प्रमाणपत्र तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे आढळून आल्यास चुकीची कागदपत्रे खोटे अथवा बनावट आढळून आल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

पेपरफुटी, भरमसाठ शुल्क, रखडलेले निकाल अन् विद्यार्थ्यांचा आक्रोश; रोहित पवारांचा सरकारला अल्टीमेटम

पडताळणीअंती वैध ठरतील, अशा उमेदवारांनाच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त पदांकरिता पात्र ठरला, तरी उमेदवार ज्या पदांकरिता पात्र ठरला आहे, त्यापैकी ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल, त्या पदाचेच नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील.

प्रमाणपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र, कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येते. या पदभरतीच्या अनुषंगाने अद्याप उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीची (Documents Verification) कार्यवाही झालेली नसल्याने प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी दरम्यान उमेदवाराने सादर केलेली प्रमाणपत्र,कागदपत्र खोटी अथवा बनावट आढळल्यास त्यास पुढील भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo