MPSC  : २०२१ पासूनच्या जाहिराती, परीक्षा अन् निकालाची सद्यस्थिती पहा एका क्लिकवर

ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहिरात निघालेल्या राज्य सेवा परीक्षेची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी २७ एप्रिल रोजी जाहिर करण्यात आली आहे. पुर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा ७ ते ९ मे २०२२ दरम्यान घेण्यात आली होती.

MPSC  : २०२१ पासूनच्या जाहिराती, परीक्षा अन् निकालाची सद्यस्थिती पहा एका क्लिकवर
MPSC Examination TimeTable

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या तसेच यापुढे नोव्हेंबर महिन्यापर्यंत होणाऱ्या परीक्षांच्या (Examination) सद्यस्थितीच माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पासून ऑक्टोबर २०२१ मधील राज्य सेवा परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ते नुकत्याच झालेल्या झालेल्या परीक्षेपर्यंतची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. (MPSC has given information about the current status of the exams in 2022 and 2023)

आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार आता चार जून रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी जाहिरात काढण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागांच्या मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आयोगाने सर्व परीक्षांची ३० एप्रिलपर्यंतच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली आहे.

लिपिक-टंकलेखकच्या निकालावरून रान पेटणार?

ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहिरात निघालेल्या राज्य सेवा परीक्षेची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी २७ एप्रिल रोजी जाहिर करण्यात आली आहे. पुर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी तर मुख्य परीक्षा ७ ते ९ मे २०२२ दरम्यान घेण्यात आली होती. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ३ एप्रिल २०२२ रोजी झाली. तर मुख्य परीक्षा ६, १३ व २७ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी सात एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आली आहे. या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना आहे.

राज्यसेवा परीक्षा २०२२ ची मुख्य परीक्षा २१ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान पार पडली. अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ही परीक्षा पाच नोव्हेंबर २०२२ रोजी झाली. विविध पदांसाठी चार फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधी मुख्य परीक्षा घेण्यात आली आहे. त्यापैकी केवळ उद्योग निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदांची निवड यादी २६ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.