SPPU News : विद्यापीठाचे उपहारगृह अडकले लाल फितीत; व्यवस्थापन परिषद लक्ष देणार का ?

विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण, चहा,नाष्टा  उपलब्ध करून देणे विद्यापीठाची जबादारी आहे.काही वर्षांपूर्वी विद्यापीठातील अनिकेत कँटिन , ओपन कँटिन, ओल्ड कँटिन या तीन कँटिन विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या असायाच्या.

SPPU News : विद्यापीठाचे उपहारगृह अडकले लाल फितीत; व्यवस्थापन परिषद लक्ष देणार का ?
SPPU News

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University - SPPU or UNIPUNE) आवारातील विविध विभागांमध्ये शिक्षक घेणा-या व विद्यापीठातील वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना चहा, नाश्ता व जेवणासाठी मर्यादित उपहारगृह (Canteen) उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना चहा, नाष्टयासाठी जयकर ग्रंथालय व आपल्या विभागापासून पायपीट करावी लागते.विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करूनही विद्यापीठाने उपहारगृहांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली नाही. परिणामी  विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनीच (Member of Pune University Management Council) यात लक्ष घालावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण, चहा, नाष्टा उपलब्ध करून देणे विद्यापीठाची जबादारी आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठातील अनिकेत कँटिन, ओपन कँटिन, ओल्ड कँटिन या तीन कँटिन विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या असायाच्या. मात्र, विद्यापीठातील या तीनही कँटिन सध्या बंद आहेत. त्यातील ओपन कँटिन, ओल्ड कँटिन या दोन्ही कँटिन कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी विद्यापीठात एकच फूड मॉल सुरू करण्यात आला आहे. या फूड मॉलमध्ये विद्यार्थ्यांना निवडक अन्न  पदार्थ मिळतात. येथील असुविधाबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. तसेच विद्यापीठातील इतर उपहारगृह सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून त्यातकडे सातत्याने दूर्लक्ष होत आहे.

हेही वाचा : SPPU NEWS: विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वसतिगृह अन् वाय-फायची सुविधा मिळेना

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार कौलास पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी बुधवारी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. त्यात रॅप साँग प्रकरणी विद्यापीठाची बदनामी झाली असून याबाबत सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल प्रसिध्द करावा, विद्यार्थ्यांना वसतीगृहासाठी त्रास देणारे वसतिग्रह प्रमुख विकास मते, सुबोध मंडलीक यांची हकालपट्टी करण्यात यावी, समान संधी केंद्र स्थापन करावे, तसेच भोजनगृह समिती गठीत करावी, सिनेट पदवीधर निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार केंद्रावर झालेल्या बोगस मतदान प्रकरणी संबंधित दोन्ही मतदान केंद्रावर गुन्हे दाखल करावे, अल्युम्नी असोसिएशनच्या कार्यालयात विशिष्ट एका पक्ष व संघटनेला बैठकीस परवाणगी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,आदी विषयांचा समावेश होता.

विद्यापीठ प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी व पाठपुरावा करून विद्यापीठातील अनिकेत कँटिन सुरू होत नाही. त्यामुळे येत्या २६ ऑगस्ट रोजी होणा-या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थ्यांशी निगडीत विषयांवर चर्चा व्हावी, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह, उपहारगृह या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्यांनी लक्ष घालावे, अशीही अपेक्षा समितीतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या निविदा प्रक्रियेला एवढा उशीर का लागत आहे. काही ठराविक व्यक्तींना अनिकेत विद्यापीठाचे कँटिन चालवायला द्यायच्या आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo