CUET UG 2023 : विद्यार्थी संख्येमुळे निकाल लांबणीवर; १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार

CUET UG  परीक्षा २३ जून रोजी संपल्यानंतर  NTA ने उत्तरसुची २८ जून रोजी प्रसिद्ध केली होती.   विद्यार्थ्यांना उत्तरसुचीवर आक्षेप सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत वेळ देण्यात आली होती.

CUET UG 2023 : विद्यार्थी संख्येमुळे निकाल लांबणीवर; १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार
CUET UG 2023 Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG २०२३) चा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होऊ शकतो, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार (Jagdish Kumar) यांनी दिली. परीक्षा झाल्यानंतर पंधरा दिवसांत निकाल जाहीर केला जाईल, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. पण अजूनही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

CUET UG  परीक्षा २३ जून रोजी संपल्यानंतर  NTA ने उत्तरसुची २८ जून रोजी प्रसिद्ध केली होती.   विद्यार्थ्यांना उत्तरसुचीवर आक्षेप सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत वेळ देण्यात आली होती. आज ती मुदत संपत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळ cuet.samarth.ac.in वर आन्सर की  तपासू शकतात, असेही जगदीश कुमार यांनी सांगितले. मात्र NTA ने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

Talathi Bharti 2023 : दिव्यांग आयुक्तालयाने मागविला खुलासा; अर्धन्यायिक प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा

अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना जगदीश कुमार म्हणाले, प्रवेश परीक्षा संगणकावर आधारित असली तरी निकाल जाहीर करण्यासाठीची बॅकएंड प्रक्रिया वेळखाऊ आहे. विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. ३० जून पर्यंत उत्तरसुचीवर आलेल्या आक्षेपांवर तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल, त्यांच्याकडून अभिप्राय मागवला जाईल.

अनेक विषयांचे तज्ञ अनेक प्रश्नपत्रिकांच्या उत्तरसुचीचे पुनरावलोकन करतील, या प्रक्रियेला अनेक दिवस लागतात. त्यानंतर तज्ज्ञ अंतिम उत्तरसुची निश्चित करतात. त्यानंतर NTA सर्व उमेदवारांचे निकाल लावते. डाटा प्रचंड असल्याने, त्याचा त्रुटीमुक्त निकाल तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो, असे जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2