आदित्य पुराणिकला सुवर्ण तर समृद्धी कुलकर्णी रौप्य पदकाची मानकरी

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा (IMDR) ४८ वा 'पदविका प्रदान समारंभ' संस्थेच्या सावरकर सभागृहामध्ये उत्साहात पार पडला.

आदित्य पुराणिकला सुवर्ण तर समृद्धी कुलकर्णी रौप्य पदकाची मानकरी
IMDR Program

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चचा (IMDR) ४८ वा 'पदविका प्रदान समारंभ' संस्थेच्या सावरकर सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. विकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा (Mukesh Malhotra) यांच्या हस्ते पदविका व पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Latest Marathi News)

मल्होत्रा यांनी पदविका धारकांना गेल्या ७० वर्षातील नवीन शोध, वातावरणीय बदल व त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले. आदित्य पुराणिक यांना सुवर्ण पदक आणि समृद्धी कुलकर्णी यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कुंटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात  'सुगम सरिता' या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बिझिनेस प्लॅन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मानित करण्यात आला. प्रा. पृथा उबगडे आणि प्रा. अमिता कुलकर्णी यांनी संयोज न केले.