‘एमबीबीएस’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये पुन्हा बदल

आता पुन्हा जुन्या नियमानुसार एमबीबीएस उमेदवारांना लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण मिळवावे लागतील.

‘एमबीबीएस’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये पुन्हा बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘एमबीबीएस’चे (MBBS) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) अधिसूचना जारी करून एमबीबीएसच्या उत्तीर्ण गुणांमध्ये (Passing Marks) बदल करण्याचा आदेश मागे घेतला आहे. आता एमबीबीएस उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच ५० टक्के गुण मिळवावे लागतील.

 

आता पुन्हा जुन्या नियमानुसार एमबीबीएस उमेदवारांना लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण मिळवावे लागतील. तर दोन पेपर असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण मिळणे बंधनकारक असेल, तरच ते या परीक्षेत यशस्वी मानले जातील.

NEET UG 2024 : वैद्यकीय आयोगाकडून NEET UG साठी सुधारित अभ्यासक्रम जारी

 

या आधी  NMC  ने १ सप्टेंबर रोजी एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये MBBS विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते की, ज्या विषयात दोन पेपर होते त्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान ४० टक्के बंधनकारक करण्यात आले होते. जे पूर्वी ५० टक्के होते. मात्र अवघ्या एक महिन्यानंतर हा आदेश आयोगाने  मागे घेतला आहे.

 

बराच विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. अभ्यासक्रमावर आधारित वैद्यकीय शिक्षण (CBME) मार्गदर्शक तत्त्वांनुसार उत्तीर्णतेची टक्केवारी ४० टक्यांवर आणणे  कोणत्याही प्रकारे शक्य नाही, त्यामुळे हा आदेश मागे घेण्यात येत आहे, असेही आयोगाचे म्हणणे आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k