Barti News : MPSC च्या मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १५ हजार मिळणार

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. त्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

Barti News : MPSC च्या मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना १५ हजार मिळणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (Barti) मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मुख्य परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (गट-अ व गट-ब), विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब), निरीक्षक, वैधमापन शास्त्र (गट-ब) आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा (गट-ब) मुख्य परीक्षा २०२३ साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.

NEET UG 2024 : वैद्यकीय आयोगाकडून NEET UG साठी सुधारित अभ्यासक्रम जारी

 

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. त्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. उमेदवाराचा दि.१५ ते १८ सप्टेंबर २०२३ यादरम्यान जाहीर झालेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, निरीक्षक वैधमापन शास्त्र, आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा निकालाच्या यादीमध्ये समावेश असावा, अशी अट आहे.

 

बार्टीच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशपत्र (Admit Card) इ. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून mpscbanti.22@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत. कागदपत्र स्व. साक्षांकित असणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक. दि. २० ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी पात्र उमेदवारांनी ०२०-२६३३३५९६ येथे संपर्क साधावा.

 

अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक - https://barti.in/upload/pdf/1696491842_ilovepdf_merged%20(10).pdf

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k