L.L.B. Admission : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

अनंत चतुर्दशी, ईदची सुट्टी, गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक भागांतील रस्ते बंद होते, मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेली इंटरनेट सुविधेमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही.

L.L.B. Admission : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
LLB Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत (CET Cell) सध्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राबविली जात आहे. विधी शाखेच्या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी (LLB Admission) दि. २९ सप्टेंबर ही अखेरची मुदत होती. पण अनंत चतुर्दशी, ईदची सुट्टी, गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक भागांतील रस्ते बंद होते, मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेली इंटरनेट सुविधेमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन (Akshay Jain) यांनी प्रवेश चाचणी कक्षाकडे ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विधी शाखे अंतर्गत तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी संस्था स्तरावरील व तिसऱ्या फेरीनंतर राहिलेल्या रिक्त जागांवरील प्रवेशाची अंतिम मुदत ही दि. २९ सप्टेंबर होती. राज्यभर दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच दि. २९ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम आराखडा २ आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर

 

अनंत चतुर्दशी निमित्त पुणे शहरासह राज्यात विविध भागात काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळा लांबल्या गेल्या. त्यामुळे अनेक रस्ते बंद होते. त्यात दि. २७ ते २९ असा सलग तीन दिवस सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे वाहतूक, इंटरनेट व इतर सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणावर परीणाम झाल्याचे दिसून आले. परिणामी अनेक पात्र विद्यार्थी व पालक हे महाविद्यालयांमध्ये एलएल.बी. ३ वर्षाच्या जागा रिक्त असून देखील प्रवेश पूर्ण करू शकले नाहीत व प्रवेशापासून वंचित राहिले, असे जैन यांनी म्हटले आहे.

 

मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सीईटी सेल द्वारे प्रवेशाचे कामासंबंधी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक देखील दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजेपर्यंत उपलब्ध नव्हती. या बाबी लक्षात घेता तीन वर्षाच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस किमान २ दिवसांची मुदतवाढ द्यावी जेणेकरून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, अशी मागणी जैन यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j