विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम आराखडा २ आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलाबाजावणीच्या दृष्टीने आवश्यक असणा-या अभ्यासक्रमांना ३० सप्टेंबरपूर्वी विद्यापरीषदेकडून मान्यता घ्यावी,असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी विद्यापरिषदेच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांना  मान्यता देण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम आराखडा २ आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) पुढील वर्षी पदवी अभ्यासक्रमास सर्व विद्यार्थ्यांना (All students in degree courses) प्रवेश दिला जाणार आहे.या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमांचा आराखाड्या पुढील एक ते दोन आठवड्यातच पाहायला मिळणार आहे. कारण एनईपी अंमलाबजावणीस सुरूवात झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या (Four years degree course) आराखाड्याला शनिवारी विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम नेमका कसा असेल हे विद्यार्थ्यांना लवकर समजू शकेल.

हेही वाचा : शिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलाबाजावणीच्या दृष्टीने आवश्यक असणा-या अभ्यासक्रमांना ३० सप्टेंबरपूर्वी विद्यापरीषदेकडून मान्यता घ्यावी,असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी विद्यापरिषदेच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांना  मान्यता देण्यात आली. या बाबत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर म्हणाले, एनईपी अंमलबजावणी संदर्भातील प्रत्येक बारकावे विद्यापरिषद सदस्यांना समजावेत यासाठी विद्यापीठातर्फे तीन दिवसांची कार्यशाळा घेण्यात येईल. तसेच सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑप्शनल सब्जेक्टची बास्केट तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलाबाजावणीच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे स्थापना करण्यात आलेल्या सुकाणू समितीतर्फे परीक्षेसंदर्भात सुचवण्यात आलेल्या पर्यायांचा स्वीकार करण्याचे विद्यापरिषदेच्या बैठकेत  निश्चित करण्यात आले.

एनईपीमधील इंडियन नॉलेज सिस्टीम व मूल्य शिक्षणावर आधारित बाबींवर काम होत नसल्याबद्दल काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठातर्फे त्यावर काम केले जाणार आहे.त्याचाप्रमाणे अनेक प्राध्यापक गेल्या १५ वर्षांमहून अधिक कालावाढीपासून काम करत आहेत. परंतु, ते पूर्णवेळ अनुदानित महाविद्यालयांमध्ये कार्यरत नसल्याने त्यांना गाईड म्हणून काम करता येत नाही. त्यामुळे त्यांचाही विचार करावा,यावर विद्यापरिषदेत चर्चा झाली.त्यावर सकारात्मकपणे विचार केला जाईल,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 
 ------------------

ज्येष्ठ नागरिक किंवा खासगी कंपनीत अनुभवी कर्माचा-यांना विद्यापीठात पीएचडी प्रवेशाची संधी उपलब्ध करून द्यावी,अशी भूमिका विद्यापरिषद सदस्यांनी मांडली.त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीप्रमाणे विचार केला जाईल ,अशी चर्चा विद्यापरिषदेच्या बैठकीत झाल्याचे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.