शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करणे गरजे : जी २० चा समारोप 

शिक्षण हे जागतिक स्तरावर मानवी प्रतिष्ठा वाढवण्यात आणि त्याला सशक्त करणात महत्त्वाची भूमिका बजावते यास सर्व जी २० सदस्यांचे एकमत व्यक्त केले आहे.तसेच शिक्षणाद्वारे लवचिक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली.

शिक्षणाद्वारे शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करणे गरजे : जी २० चा समारोप 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

   शिक्षणाद्वारे लवचिक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करण्याच्या गरजेवर सर्व जी २० सदस्यांनी (G20 members ) सहमती दर्शवली.तसेच शिक्षण हे केवळ द्यायचे म्हणून देऊ नये तर त्यातून सर्व विद्यार्थ्यांना भविष्याची तयार करता यावी, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करता यावीत,यासाठी असावे यावरही सर्व सदस्यांचे एकमत झाले, अशी माहिती केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान  (Dharmendra Pradhan Cabinet Minister for Education and Skill Development and Entrepreneurship Government of India) यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. 
   

  पुण्यात आयोजित जी २० च्या शिक्षण कार्यकरी गटाच्या बैठकीच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषदेत धर्मेंद्र प्रधान बोलत होते. यावेळी इंडोनेशिया व ब्राझीलचे शिक्षण मंत्री, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के.संजय मूर्ती , शालेय शिक्षण सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते. 
    
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, शिक्षण हे जागतिक स्तरावर मानवी प्रतिष्ठा वाढवण्यात आणि त्याला सशक्त  करणात महत्त्वाची भूमिका बजावते यास सर्व जी २० सदस्यांचे एकमत व्यक्त केले आहे. तसेच शिक्षणाद्वारे लवचिक, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्र काम करण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. 
तसेच वय, लिंग, सामाजिक-आर्थिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा शारीरिक, मानसिक किंवा इतर शिकण्याच्या अडचणी किंवा विशेष गरजांचा सामना करत असलेल्या प्रत्येकाला दर्जेदार, समावेशक आणि न्याय्य शिक्षण आणि प्रशिक्षण मिळायला हवे यास संमती दिली. सर्व सदस्यांनी आजीवन शिक्षणाची गरजही अधोरेखित केली.तसेच डिजीटल क्षेत्रातील परिवर्तन, महिला-नेतृत्व विकास, हरित संक्रमण आणि शाश्वत विकासासाठी शिक्षण आणि जीवनशैलीला प्राधान्य देण्यावर भर देण्यास सकारात्मकता दाखवली. 


सर्व G20 सदस्यांनी विशेषतः मिश्रित शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुनिश्चित करणे,  प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण अधिक समावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनवणे , आयुष्यभर शिकण्यास प्रोत्साहन देणे , शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये समृद्ध सहकार्याद्वारे संशोधनाला बळकटी देणे आणि नवकल्पनास प्रोत्साहन देणे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या मुद्यांवर सहमती दर्शवली,असेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.