बी.एड. प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू; चार फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

सीईटी-सेल च्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यात बीएड अभ्यासक्रमाचा ही समावेश आहे.

बी.एड. प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू; चार फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (B.Ed. Admission) अखेर सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या फेरीसाठी येत्या १४ सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांचे पसंती क्रम नोंदविता येणार आहेत. प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर संस्था पातळीवरील एक फेरी राबविली जाणार असून येत्या ३० ऑक्टोबरनंतर एकाही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. (CET Cell)

 

सीईटी-सेल च्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यात बीएड अभ्यासक्रमाचा ही समावेश आहे. बीएड प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १४ सप्टेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यानंतर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. येत्या १८ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेशास पात्र विद्यार्थी १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील.

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांची होणार झाडाझडती; लेखापरीक्षकांच्या पॅनेलला मान्यता

 

बीएड प्रवेशाच्या रिक्त जागांची माहिती २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशाची दुसरी फेरी २९ सप्टेंबर रोजी सुरू होईल. विद्यार्थी २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेऊ शकतील. प्रवेशाची तिसरी फेरी ५ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे १८ ऑक्टोबर पर्यंत तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी संस्था स्थरावरील कॅप राऊंड सुरू होईल.

 

सीईटी सेल मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा विचार करता बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सर्वात उशिरा सुरू झाली आहे. काही अभ्यासक्रमाचे सत्र सुरू झाले असून पुढील काही दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली जाणार आहे.

 

राज्य शासनाने बीएड अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना न हरकत प्रमाणपत्र देण्यास विलंब केल्यामुळे बीएड अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया बरीच लांबली. आधीच बीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. आता उशिराने प्रवेश प्रक्रिया होत असल्याने विद्यार्थी संख्येत अधिक घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j