साखर कारखाना चालविणार कृषी महाविद्यालय; राज्यातील पहिला कारखाना

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होईल. महाविद्यालयाची प्रतिवर्ष प्रवेश क्षमता ६० असून हे खासगी कायमस्वरुपी विना अनुदानित तत्वावरील आहे.

साखर कारखाना चालविणार कृषी महाविद्यालय; राज्यातील पहिला कारखाना
New Agriculture College

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारने राज्यातील पहिल्या साखर कारखान्याला कृषी महाविद्यालय (Agriculture College) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना (Sahyadri Sahakari sakhar Karkhana) राज्यातील असा पहिला कारखाना ठरला आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व निकष पुर्ण केल्याने महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होईल. महाविद्यालयाची प्रतिवर्ष प्रवेश क्षमता ६० असून हे खासगी कायमस्वरुपी विना अनुदानित तत्वावरील आहे. तसेच कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मोठी बातमी : परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अखेर अटक

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे यापुर्वी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयही आहे. आता या कारखान्याला नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. असे कृषी महाविद्यालय चालविणारा हा राज्यातील पहिला कारखाना ठरणार आहे. महाविद्यालयामध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण व शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमानुसार करण्यात येतील.

पदवी अभ्यासक्रमांची शुल्क निश्चिती, शुल्क नियामक प्राधिकरण व शासनाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. शिक्षण विषयक कार्यप्रणाली यांचे संनियंत्रण करण्याचे अधिकार महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला राहतील.

कृषी महाविद्यालयाला मान्यता देताना संबंधित सस्थेंने निकष पूर्ण करणे आवश्यक असते. प्रामुख्याने संस्थेच्या नावावर निकषानुसार आवश्यक जमीन असावी लागले. संबंधित साखर कारखान्याकडून जमिनीसह इतर निकष पूर्ण केल्याने मान्यता देण्यात आली आहे. या कारखान्यात पुर्वी कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा सुरू आहे, असे परिषदेतील सुत्रांनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD