वर्षभराच्या विलंबानंतर अखेर शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा; मुंबईतील दोघांचा समावेश

शांती स्वरुप भटनागर पुरस्कार हा देशातील विज्ञान क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील वर्षी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती.

वर्षभराच्या विलंबानंतर अखेर शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा; मुंबईतील दोघांचा समावेश
Shanti Swarup Bhatnagar Award

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) शांती स्वरूप भटनागर पुरस्कार-२०२२ (Shanti Swarup Bhatnagar Awards 2022) ची घोषणा केली आहे. देशभरातील १२ तरुण वैज्ञानिकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये IIT मुंबईतील  देबब्रत मैती आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईमधील बासुदेव दासगुप्ता या दोघांचा समावेश आहे.

 

शांती स्वरुप भटनागर पुरस्कार हा देशातील विज्ञान क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील वर्षी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यंदाचे पुरस्कार कधी जाहीर होणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान,  पाच लाख रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांची होणार झाडाझडती; लेखापरीक्षकांच्या पॅनेलला मान्यता

 

पुरस्कार जाहीर झालेले दासगुप्ता यांची भौतिकशास्त्राच्या श्रेणीतील पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर मैती यांना रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातील संशोधनाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी, कोलकाता येथील इम्युनोलॉजिस्ट दीप्यमन गांगुली यांना त्यांच्या  वैद्यकीय विज्ञानातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

पुरस्कारांमध्ये  चंदीगड येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अश्विनी कुमार, हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक्सचे जीवशास्त्रज्ञ मदिका सुब्बा रेड्डी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळुरूचे अक्कट्टू टी बिजू,  पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान या श्रेणीत गांधी नगरच्या इंडियन इन्स्टिट्यूटचे विमल मिश्रा यांचा समावेश आहे.

 

त्याचप्रमाणे इंजिनीअरिंग सायन्सेस क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीच्या  दीप्ती रंजन साहू, IIT मद्रासचे रजनीश कुमार, IIT बंगळुरूचे  बंगळुरूचे नीरज कायल आणि अनिंद्य दास यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर  गणित विज्ञान क्षेत्रातील पुरस्कारासाठी  मायक्रोसॉफ्ट रिसर्च लॅब इंडियाच्या अपूर्व खरे यांची  निवड झाली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j