आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर

मार्ड (MARD) या विद्यार्थी संघटनेने, अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सहभागी होण्याकरीता या अभ्यासक्रमाचा निकाल दि. ३१ जुलै पुर्वी जाहीर करण्यात यावा, अशी विनंती केलेली होती.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल जाहीर
MUHS, Nashik

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२३ सत्रातील लेखी परीक्षांचे निकाल (MUHS Exam Results) जाहीर करण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर केवळ दोन दिवसातच निकाल जलदगतीने जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) यांनी दिली. 

निकालांविषयी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी अधिक माहिती दिली. दि. २० जूनपासून राज्यातील विविध परीक्षाकेंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. मार्ड (MARD) या विद्यार्थी संघटनेने, अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या (राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त संस्थांमध्ये) प्रवेश प्रक्रियेस सहभागी होण्याकरीता या अभ्यासक्रमाचा निकाल दि. ३१ जुलै पुर्वी जाहीर करण्यात यावा, अशी विनंती केलेली होती.

उच्च शिक्षण सहसंचालकांवर प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षांनी टाकला दबाव ? ; पोलिसांकडे लेखी तक्रार

त्याअनुषंगाने दि. २० पासून सुरू करण्यात आलेल्या PG Medical : (MD, MS, PG Diploma, M.Sc.Medical (Biochemistry/Microbiology) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन पध्दत राबविण्यात आली. लेखी परीक्षा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. उत्तरपत्रिका ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणीसाठी विद्यापीठ संलग्नित ४१ वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये Digital Evaluation Centre ची उभारणी करुन ऑनलाईन पध्दतीने मुल्यांकन करण्यात आले.

उत्तरपत्रिकांची ऑनलाईन प्रणालीद्वारे तपासणी प्रक्रिया राबवितांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कुलगुरूंनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आश्वासित केल्यानुसार, वेळेची निकड व विद्यार्थीहित लक्षात घेता Onscreen Evaluation of Answer Books प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली आणि पदव्यूत्तर वैद्यकिय अभ्यासक्रमाचा निकाल प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच दि. २० जुलै रोजी जाहीर करण्यात आला. ऑनस्क्रिन इव्हॅल्युएशन या प्रायोगिक तत्वावरील प्रणालीचे कार्य यशस्वीतेच्या अनुषंगाने हिवाळी-२०२३ सत्रातील परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांना ही पध्दत लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD